आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूल:तालिबानच्या हल्ल्यापासून बचावासाठी अफगाणचे मेजर कुटुंबीयांसह अमेरिकेत आश्रयाला जाणार

काबूल / डेविड ज्युचिनो, कियाना हायरी17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अफगाणिस्तानमध्ये हजारा समुदायासोबत भेदभाव, हल्ले सुरूच

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भल्या पहाटेच मेजर नईम असदी, त्यांची पत्नी रहिमा व ५ वर्षीय मुलगी जैनब वेगवेगळ्या बॅग व सुटकेसमध्ये आवश्यक सामान पॅक करण्यात मग्न होते. त्यांच्या चेहऱ्यावर घाईगडबड आणि घबराट स्पष्ट दिसून येत होती. कारण त्यांनी जीवनाचा सर्वात मोठा निर्णय घेतला होता. दहशतवाद्यांपासून कुटुंबाला वाचावण्याचा त्यांचा हा निर्णय होता. सध्या ते अमेरिकेच्या आश्रयाला आहेत. मेजर नईम अफगाण एअरफोर्समध्ये वैमानिक आहेत. त्यांना ठार करण्याचा तालिबानचा डाव आहे. कारण काय तर ते हजारा समुदायाचे आहेत. तालिबानने या समुदायातील हजारो लोकांना शोधून मारले आहे. याच भीतीमुळे सात महिन्यांपासून पत्नी व मुलीसोबत मेजर लपून राहू लागले आहेत. नईम म्हणाले, हजारा असल्याने मला सैन्यातही भेदभावाची वागणूक मिळत होती. आता कमांडर्सनी अनेकदा ड्यूटीवर बोलावले, परंतु मी त्यास नकार दिला. तालिबान मेजरला कोणत्याही किमतीत ठार करण्याचे मनसुबे बाळगून आहे. दहशतवाद्यांनी सोशल मीडियावर मेजरचे छायाचित्र टाकले आहे. सोबत ‘त्याला शोधून खात्मा करा’ असा संदेश दिला आहे. अशा असुरक्षित वातावरणामुळे असदी कुटुंबासमवेत आता अमेरिकेत राहणार आहेत.

मानवी पॅरोलवर १ वर्ष अमेरिकेत राहणार
मेजर असदी यांना मानवी पॅरोल मिळाला आहे. त्यासाठी त्यांना एका अमेरिकी वकिलाने मदत केली आहे. अमेरिकी नागरिकत्व व स्थलांतर सेवेअंतर्गत त्याची तरतूद आहे. त्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. या पॅरोलवर कोणलाहीएक वर्ष राहता येते.

बातम्या आणखी आहेत...