आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडियावरील खोट्या बातम्याच्या प्रसाराला आळा घालण्याचा लढा ऑनलाइन गेम्सच्या माध्यमातून दिला जात आहे. खोट्या माहितीविरुद्धच्या लढ्यात खेळ हे शस्त्र बनले आहे. ‘कॅट पार्क’ हा असाच एक खेळ आहे. हा विनामूल्य १५ मिनिटांचा गेम ऑनलाइन खोटी माहिती पसरवणाऱ्या गेमच्या सर्व पैलूंचा शोध घेतो. यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या ग्लोबल एंगेजमेंट सेंटरच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या या शैक्षणिक साधनाचे उद्दिष्ट शत्रू देशाचा प्रचार जाणून घेणे आणि समजून घेणे, त्याचा पर्दाफाश करणे हा आहे.जगातील बहुतेक देश फेक न्यूज आणि कट-कारस्थानामुळे हैराण आहेत. नेदरलँडमधील डेव्हलपर टिल्टस्टुडिओने यूके, युरोपियन कमिशन आणि नाटोसाठी अपप्रचाराच्या विरोधात लढा देण्यासाठी गेम तयार केले आहेत.
कोविड महामारीदरम्यान, चुकीच्या माहितीचा प्रतिकार करण्यासाठी पाच मिनिटांचा गेम “गो व्हायरल” तयार केला. ग्लोबल एंगेजमेंट सेंटरचे (जीईसी) डेव्हर डेव्हिस यांच्या म्हणण्यानुसार, खोटे माहिती पसरणे आणि त्यानंतर ती फेटाळण्याची वाट पाहण्याऐवजी खोटे पसरवण्याच्या सामान्य तंत्रांबद्दल लोकांमध्ये जागरुकता वाढवण्यासाठी यासारख्या ऑनलाइन गेमची मदत घेऊ शकतो. अशाच एका जीईसी गेममध्ये, “हार्मनी स्क्वेअर्स”, केंब्रिज विद्यापीठाला असे आढळून आले की त्याचे खेळाडू फसवणूक सामग्री शोधण्यात सक्षम आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.