आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांद्रमोहीम थांबली:नासाची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम अर्टेमिस 1 ची उलटगणती रोखली, एका इंजिनमध्ये बिघाड

वॉशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम अर्टेमिस 1 चे 29 ऑगस्ट रोजी होणारे लाँचिंग इंधन लीक झाल्यामुळे रोखण्यात आले. नासा मानवरहित स्पेस लाँच सिस्टिम रॉकेट (एसएलएस) आणि ओरियन कॅप्सूलला अर्टेमिस 1 मिशनच्या रूपात लाँच करणार होती. प्राथमिक तपासणीत रॉकेटच्या 4 पैकी एसएलएस रॉकेटच्या आरएस-25 इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रक्षेपण रोखले. भारतीय वेळेनुसार सोमवारी सायंकाळी फ्लोरिडा किनाऱ्याच्या केनेडी स्पेस सेंटरवरील लाँच पॅड 39 बीवरून हे प्रक्षेपित होणार होते.

टी-40 मिनिटांवर रोखले

प्रक्षेपणाआधी द्रवरूप हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा स्राव केला जाणार होता, मात्र त्यातील एका इंजिनमधून तो अपेक्षेनुसार होत नसल्याचे अभियंत्यांच्या लक्षात आल्यानंतर टी-४० मिनिटांवर प्रक्षेपण रोखले. रॉकेट सॅटर्न व्हीनंतर अर्टेमिस नासाचा हा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे.

6 आठवड्यांचे मिशन
साधारण ६ आठवड्यांच्या या मिशनमध्ये एसएलएस आणि ओरियन या मोहिमेत ६५ हजार किमीचा प्रवास पूर्ण करणार होते.

बातम्या आणखी आहेत...