आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना संकट:अमेरिकेच्या 50 पैकी 33 राज्यांत संसर्गात वाढ; खाटा, व्हेंटिलेटरची मागणी

वाॅशिंग्टन10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करून वावरताना दिसले. वाॅल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरला त्यांनी भेट दिली हाेती. - Divya Marathi
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करून वावरताना दिसले. वाॅल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरला त्यांनी भेट दिली हाेती.
  • जगातील पहिल्या काेराेना लसीचे परीक्षण पूर्ण झाल्याचा रशियन विद्यापीठाचा दावा

अमेरिकेच्या ५० पैकी ३३ राज्यांत काेराेना संसर्गाचा वेग वाढला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत किमान ६० हजार रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच घटना आहे. गेल्या गुरुवारपासून आतापर्यंत सर्वाधिक ७१ हजार ७८७ रुग्ण आढळून आले. आराेग्य विभागाने पहिल्यांदाच फ्लाेरिडाच्या रुग्णालयांत भरती रुग्णांची संख्या जारी केली आहे. आराेग्य क्षेत्रातील तज्ञांनी त्यासाठी विभागावर दबाव आणला हाेता. फ्लाेरिडात ६ हजार ९९१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. मियामी डॅड काैंटी हाॅटस्पाॅट बनले आहे.

गेल्या १४ दिवसांत येथील रुग्णालयांत रुग्णांचे प्रमाण ७४ टक्क्याने वाढले. व्हेंटिलेटरचा वापरही १२३ टक्क्यांनी वाढला. संसर्गाचा सरासरी दरही १८ टक्क्यांनी वाढला. ताे आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. येथील जॅक्सन मेमाेरियल रुग्णालयाचे डाॅ. डेव्हिड डी ला जेरडा म्हणाले, मियामी डॅड केवळ एक उदाहरण आहे. संपूर्ण दक्षिण फ्लाेरिडात परिस्थिती वाईट हाेत चालली आहे. आराेग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनीही शुक्रवारी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यासाठी त्यांंनी मियामीला भेट दिली हाेती. संपूर्ण फ्लाेरिडात काेराेनाचे आतापर्यंत ११ हजार ४३३ रुग्ण आढळून आले, तर ९३ जणांचा मृत्यू झाला. कॅलिफाॅर्नियात १४९ मृत्यू झाले. राज्यात एकाच िदवसात सर्वाधिक मृत्यूची ही संख्या आहे. आतापर्यंत येथे ३ लाखांहून जास्त रुग्ण आढळून आले. 

चाैदा दिवसांच्या संसर्ग दरात ७.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यापैकी ६० टक्के रुग्ण १८ ते ४९ वयाेगटातील आहेत. दुसरीकडे तुरुंगांत काेराेनामुळे सुमारे २५ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सरकारने आॅगस्टपर्यंत ८ हजार कैद्यांची सुटका करण्याची घाेषणा केली. टेक्सास, जाॅर्जियामध्येदेखील रुग्णालयांत खाटांची कमतरता जाणवू लागली आहे. जाॅर्जिया अटलांटा शहरातील वर्ल्ड काँग्रेस सेंटर हाॅलला रुग्णालयात रूपांतरित करण्यात आले आहे. कॅराेलिनामध्ये एक खासदार बाधित झाला आहे. आतापर्यंत २८ राज्यांतील ७५ खासदार काेराेनामुळे बाधित झाले आहेत. अमेरिकेत एकूण ३३ लाख ५६ हजार २४२ रुग्ण आढळून आले, तर १ लाख ३७ हजार ४१४ जणांचा मृत्यू झाला.

जगातील पहिल्या काेराेना लसीचे परीक्षण पूर्ण झाल्याचा रशियन विद्यापीठाचा दावा

माॅस्काे । काेराेना विषाणू संसर्गावर जगातील पहिली लस विकसित करण्यात यश आल्याचा दावा रशियाच्या सेचनाेव्ह विद्यापीठाने केला. प्रकल्पात सहभागी संशाेधक वदिम तरसाेव म्हणाले, प्रयाेगातील स्वयंसेवकांना २० जुलैपर्यंत सुटी दिली जाईल. हा प्रयाेग १८ जून राेजी सुरू करण्यात आला हाेता. अन्य तज्ञ अलेक्झांडर लुकाशेव म्हणाले, ही लस माणसासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. आता संशाेधक महामारीच्या स्थितीच्या अनुकूल लसीचे उत्पादन करण्याची रणनीती तयार करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...