आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहशत आणि एंग्जायटी भावनांमुळे हृदयाची स्पंदने वेगवान होतात. आता अभ्यासात समोर आलेल्या निष्कर्षानुसार, याचा उलटही होत आहे. म्हणजे, हृदयाची धडधड वेगवान होऊन एंग्जायटीची पातळी वाढते. कृत्रिम पद्धतीने हृदयाची धडधड वेगवान केल्याने एंग्जायटीच्या पातळीतील वृद्धीमुळे शास्त्रज्ञ या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत. यामुळे असे वाटते की, हृदयाची धडधड वेगवान होऊन मेंदूला चिंता करण्याचा संदेश देतात. कॅलिफोर्नियात स्टॅनफोर्ड विद्यापीठातील न्यूरोसायन्स्टिस्ट कार्ल डेसरोथ यांच्या म्हणण्यानुसार, मेडिकल स्कूलच्या काळात हा प्रश्न समोर आला. त्यांनी हे समजण्यासाठी ऑप्टोजेनेटिक्सची मदत घेतली. ज्यात प्रकाशाचा वापर करून पेशींची गती नियंत्रित केली जाऊ शकते. कारण,त्यांनी उंदराच्या हृदयाची धडधड ऑप्टोजेनिक सिस्टिमद्वारे ६६० बीट प्रति मिनिटापासून ९०० पर्यंत वाढवली. धडधड जास्त झाली तेव्हा उंदराच्या शरीर क्रियेतून दिसले की, एंग्जायटी निर्माण होत होती. यातून दिसते की, मेंदू आणि हृदयाने मिळून एंग्जायटी निर्माण केली. शरीराची अवयव प्रणाली आणि एंग्जायटीतील संंबंधावर अभ्यास करणाऱ्या ओक्लाहोमाच्या ट्यूल्सात लॉरिएट इन्स्टिट्यूट फॉर ब्रेन रिसर्चमध्ये मानसोपचार तज्ज्ञ साहिब खालसा यांच्या म्हणण्यानुसार, आपल्याला आधीपासून माहीत आहे की, श्वासाचा वेग कमी करून केल्याने चिंता कमी करण्यात मदत मिळते. ही पद्धती उपयोगी पडत आहे.
कोडे : जाणिवेतून भावना निर्माण की भावनांतून जाणीव?
भीतिदायक ओरडणे ऐकल्यावर अंगावर शहारे उभे राहतात. भावनांमुळे ही जाणीव झाली की जाणीवेमुळे भावना हा शास्त्रज्ञांसमोर अंडे आधी की कोंबडी आधी,असा वर्षांपासूनचा प्रश्न आहे. १८८० मध्ये विल्यम जेम्स यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.