आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निंदनीय! अमेरिकेत भारतीयाचा भारतीयावर वर्णद्वेषी हल्ला:थुंकत केली शिवीगाळ; म्हणाला डिस्गस्टींग डॉग, घटिया हिंदू

कॅलिफोर्नियाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात एका भारतीय-अमेरिकन व्यक्तीने दुसऱ्या भारतीयावर वर्णद्वेषी टीका करत त्याला शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. तेजिंदर सिंह असे शिवीगाळ करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याने कृष्णन जयराम या भारतीय व्यक्तीला डर्टी हिंदू आणि डिस्गस्टींग डॉग असे संबोधले. ही घटना २१ ऑगस्ट रोजी कॅलिफोर्नियातील फ्रेमॉन्ट शहरातील टाको बेल रेस्टॉरंटमध्ये घडली. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
सोमवारी ३७ वर्षीय आरोपी तेजिंदर सिंहविरोधात द्वेषपूर्ण गुन्हा, नागरी हक्कांचे उल्लंघन, हल्ल्याच्या आरोपात गुन्हा नोंदवण्यात आला. कागदपत्रांमध्ये त्याचा उल्लेख एशियन/इंडियन असा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच टेक्सासमध्ये एका मेक्सिकन-अमेरिकन महिलेने चार भारतीय-अमेरिकन महिलांवर वर्णद्वेषी हल्ला करत तिच्यावर हातही उगारला होता.
८ मिनिटे शिव्या देत होता तेजिंदर सिंह
वर्णद्वेषी हल्ल्यातील पीडित कृष्णन जयराम यांनी ही घटना त्यांच्या फोनमध्ये चित्रीत केली. तेजिंदर सिंह ८ मिनिटे शिवीगाळ करत असल्याचे यात दिसते. तु डिस्गस्टींग डॉग आहे. तु इतका खराब दिसतो की तु सार्वजनिक ठिकाणी आले नाही पाहिजे. हा भारत नाही. तु इंडियात होता, आता तु अमेरिकेत आहे. असे तेजिंदर त्यांना म्हणतो. तेजिंदर त्यांना तु घटिया हिंदू म्हणतो. तु मटणही खात नाही असेही तेजिंदर म्हणाला. यानंतर तो अनेकदा बीफ हा शब्द म्हणाला.

वर्णद्वेषी टिप्पणी करणारा आरोपी तेजिंदर सिंह.
वर्णद्वेषी टिप्पणी करणारा आरोपी तेजिंदर सिंह.

हल्लेखोर भारतीय होता हे जास्त दुःखद - जयराम
कृष्णन जयराम माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी रेस्टॉरंटमध्ये भांडण्यासाठी आलेलो नाही असे मी तेजिंदरला म्हणाले. तुला काय पाहिजे असे मी त्याला म्हणालो. त्यावर तो म्हणाला की, तुम्ही हिंदू घटिया आणि लज्जास्पद आहात. यानंतर तेजिंदर त्यांच्यावर थुंकला. यानंतर जयराम आणि रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांनी फ्रेमॉन्ट पोलिसांना फोन केला.

हल्ला झालेले पीडित कृष्णन जयराम.
हल्ला झालेले पीडित कृष्णन जयराम.

या घटनेनंतर आपण घाबरल्याचे तेजिंदर म्हणाले. हल्लेखोर भारतीय असल्याचे ऐकल्यानंतर आणखीन दुःख झाल्याचेही ते म्हणाले. मला खरंच खूप भीती वाटली. मला रागही आला. पण भीती होती की हा व्यक्ती आक्रमक होऊन माझ्या मागे आला तर काय होईल?
टेक्सासमध्येही भारतीय महिलांवर वर्णद्वेषी हल्ला

अमेरिकेच्या टेक्सासच्या प्लानो शहरातील सिक्स्टी वाईन्स रेस्टॉरंटबाहेरही चार महिला भारतीय टोनमध्ये बोलत होत्या. तेव्हा मेक्सिकन-अमेरिकन महलिने त्यांच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करत शिवीगाळ केली. तिने एका भारतीय महिलेला थप्पडही लगावली. २४ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महिलेला अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...