आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Andy Jassy Will Be The New CEO Of Amazon, But World's Richest Business Man Jeff Bezos Will Not Retire

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेफ बेजोस CEO पद सोडणार:23 वर्षांपूर्वी अॅमेझॉनमधून करिअरची सुरुवात करणाऱ्या जेसीकडे कंपनीची धुरा

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जेफ बेजोस कर्मचाऱ्यांना म्हणाले- निवृत्त होणार नाही

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अॅमेझॉन कंपनीचे मालक जेफ बेजोस यांनी कंपनीचे सीईओ पद सोडण्याची घोषणा केली आहे. या वर्षाच्या तिमाहीत बेजोस आपले पद सोडू शकतात. परंतु, त्यांनी निवृत्त होण्याच्या वृत्तांचे खंडन केले. त्यांच्या जागी आता अँडी जेसी कंपनीचे नवीन CEO असतील. बेजोस आता बोर्डाचे कार्यकारी अध्यक्ष झाले आहेत.

जेफ बेजोस यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून जेसी यांच्या नवीन जबाबदारीबद्दल कर्मचाऱ्यांना विश्वास दिला. बेजोस म्हणाले की, जेसी एक चांगले लिडर आहेत. जेसी सध्या अॅमेझॉनच्या वेब सर्विसचे प्रमुख आहेत. जेसी यांनी अॅमेझॉनमध्ये 1997 मध्ये मार्केटिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 2003 मध्ये कंपनीमध्ये क्लाउड सेवा देणाऱ्या जेसी यांनी एडब्ल्यूएसची सुरुवात केली होती. हे डिवीझन अॅमेझॉनला सर्वाधिक फायदा देणारे आहेत.

बेजोस आता अ‍ॅमेझॉनच्या महत्त्वपूर्ण उपक्रमात सामील होतील

अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना लिहीलेल्या पत्रात बेजोस म्हणतात की, ते आता अॅमेझॉनच्या महत्वाच्या उपक्रमात सामील होती. आता ते परोपकारी प्रयत्नांकडे अधिक लक्ष देतील. यात डे वन फंड, बेजोस अर्थ फंड, अंतराळ रिसर्च और पत्रकारितेशी संबंधित इतर उपक्रम सामील आहेत.

1994 मध्ये ऑनलाइन बुक स्टोअरपासून झाली होती अॅमेझॉनची सुरुवात

जेफ बेजोस यांनी 1994 मध्ये एका ऑनलाइन बुक स्टोअरपासून अॅमेझॉनची सुरुवात केली होती. आता हीच कंपनी मेगा ऑनलाइन रिटेलरमध्ये बदलली आहे. ही कंपनी जगातील जवळ-जवळ सर्वच प्रकारचे प्रोडक्त विकते. अॅमेझॉनशिवाय 57 वर्षीय बेजोस वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्र आणि खासगी अंतराळ कंपनी 'ब्लू ओरिजिन'चे मालक आहेत.

बातम्या आणखी आहेत...