आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदाचा गैरवापर:कर्तव्यात कसूर, अनिल देशमुख यांच्यावर ठपका; सीबीआय कोर्टात आरोपपत्र

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी देशमुख यांच्यावर हे आरोप केले होते. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज मंजूर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी देशमुखांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.

सीबीआयने मुंबईतील विशेष न्यायालयात अनिल देशमुख व त्यांचे सहकारी संजीव पलांडे, कुंदन शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कट आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. सिंग यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी दरमहा बार आणि रेस्तराँकडून १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता.

बातम्या आणखी आहेत...