आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडनमधील एका रेस्तरॉंमध्ये काही प्राणीप्रेमींनी घुसून गोंधळ घातला. त्यानंतर रेस्तरॉंच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना उचलून बाहेर काढले. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, आंदोलक लंडनच्या नाइट्सब्रिजमधील नुसर-एट (Nusr-Et) रेस्तरॉंमध्ये घुसले आणि निदर्शने केली.
तुर्कीचे प्रसिद्ध शेफ नुसरेत गोकसे (Nusret Gokce) हे लग्झरी रेस्तरॉं Nusr-Etचे मालक आहेत. प्राणी आणि हवामान न्याय गटाच्या 'अॅनिमल रिबेलियन'च्या सदस्यांनी येथे निदर्शने केली. त्यानंतर रेस्तरॉंच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. या ग्रुपने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये कर्मचारी आंदोलकांना बाहेर काढताना दिसत आहेत.
रेस्तरॉंमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाला विरोध करत होते
'अॅनिमल रिबेलियन'च्या सदस्यांनी सोशल मीडिया पोस्टवर लिहिले - आमच्या सदस्यांना लंडनमधील नुसर-एट रेस्तरॉंमधून बाहेर काढण्यातआले. हे रेस्तरॉं मांस आणि मांसाहारी पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. लोकांना अशा प्रकारचे अन्न देणे म्हणजे प्राण्यांचे शोषण आहे. त्यामुळे पर्यावरणालाही धोका आहे. ही शाश्वत अन्न व्यवस्था नाही.
लग्झरी जेवणालाही विरोध
दुसर्या पोस्टमध्ये, ग्रुपने लिहिले - आमचे सदस्य शांततेत काम करत होते. कारण आलिशान जेवणातून समाजातील विषमता दिसून येते. ब्रिटनमध्ये महागाई वाढत आहे. येथे हवामान आणि पर्यावरणीय संकटे आहेत. असे असूनही श्रीमंत लोक आलिशान जेवणावर पैसे खर्च करत आहेत.
हवामान कार्यकर्त्यांनी 900 गाड्यांचे टायर पंक्चर केले
'द टायर एक्टिंग्विशर' नावाच्या क्लायमेट अॅक्टिव्हिस्ट ग्रुपने जगातील 8 देशांमध्ये अनोखे आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी सुमारे 900 गाड्यांचे टायर पंक्चर केले.
600 कोटींच्या पेंटिंगवर टोमॅटो सूप फेकले
युरोपला हवामान बदलाचा फटका बसत आहे. त्यामुळे तेथे सातत्याने लोक वेगवेगळ्या पद्धतीने निदर्शने करत आहेत. जर्मनीच्या आधी लंडनमध्ये निदर्शने झाली. येथील नॅशनल गॅलरीत दोन आंदोलकांनी व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या पेंटिंगवर टोमॅटोचे सूप फेकले. सनफ्लॉवर नावाच्या या पेंटिंगची किंमत 600 कोटी रुपये होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.