आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे संकट:वर्धापनदिनी फेसबुकला मोठा झटका; 10 लाख सक्रिय युजर घटले, शेअरमध्ये 25% घसरण, मार्केट कॅपलाही 17.5 लाख कोटी रु. चा फटका

माइक आयझॅक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेक न्यूजसह अनेक आरोप असलेल्या सर्वात मोठ्या सोशल मीडिया कंपनीसमोर नवे संकट

लाँचिंगची १८ वर्षे पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी फेसबुक आणि तिच्या गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. पॅरेंट कंपनी मेटाद्वारे बुधवारी जारी तिमाही अहवालानुसार, फेसबुकने २०२१ च्या अखेरच्या तीन महिन्यांत १० लाख सक्रिय युजर्स गमावले आहेत. त्यामुळे गुरुवारी अमेरिकी शेअर बाजार उघडल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये २५.४५% ची घसरण झाली. मार्केट कॅप एका झटक्यात १७.५ लाख कोटी रुपयांनी घटून ५१.२ लाख कोटी रुपये झाले. एक दिवसाआधी ते ६८.७ लाख कोटी रुपये होते. म्हणजे कंपनीचे शेअर आणि मार्केट कॅप दीड वर्षापूर्वीच्या (१७ जुलै २०२०) स्तरावर आले. गुरुवारी ट्रेडिंगदरम्यान शेअरचा भाव २४०.८० डॉलर होता.

४ फेब्रुवारी २००४ ला सुरुवात, २००९ पासून सक्रिय युजर्सची संख्या जाहीर करणे आणि २०१२ मध्ये शेअर बाजारात लिस्टेड झाल्यानंतर फेसबुकला प्रथमच अशा स्थितीचा सामना करावा लागला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या निराशाजनक कामगिरीसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मही जबाबदार आहे. मेटाला २०२१ च्या अंतिम तिमाहीत ७७,२५० कोटी रुपयांचा नफा झाला होता तरीही दररोजच्या युजर्सची संख्या अपेक्षेनुसार वाढू शकली नाही. ऑक्टोबरअखेरीस नाव बदलून मेटाव्हर्स ठेवल्यानंतर कंपनीचा हा पहिला निकाल आहे. उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी राहण्यासाठी कंपनीने अॅपललाही जबाबदार ठरवले आहे. तिचे म्हणणे आहे की, अॅपलने प्रायव्हसी नियमांत केलेल्या बदलामुळेही समस्या निर्माण झाली आहे. कंपनीने म्हटले आहे की, टिकटॉक आणि गुगलच्या यू ट्यूबकडूनही तिला आव्हान मिळत आहे.

याचा परिणाम इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या शेअरवरही झाला. ट्विटरचे शेअर ८.०३% नी घसरून ३३.५८ डॉलरवर आले. स्नॅपचे शेअर १७.८०% नी घसरून २६.३६ डाॅलरच्या खालच्या स्तरावर आले. पिंटरेस्टचे शेअर १०.७६% नी घसरून २४.३९ डॉलरच्या स्तरावर आले. स्पॉटिफाय टेकच्या शेअरमध्ये १३.४०% ची घसरण झाली. कंपनीच्या शेअरचे दर घटून १६६.२० डॉलरवर आले.

६ मोठ्या वादांनी फेसबुकला नेले बॅकफूटवर, पुनरागमन आव्हानात्मक
अमेरिकी संसदेवरील हल्ल्याच्या घटनेत फेसबुकवर द्वेष पसरवण्याचा आरोप झाला. लसीबाबत चुकीची माहिती रोखण्यास फेसबुक अपयशी ठरली. महामारीशी संबंधित चुकीची पोस्टही हटवण्यात आली नाही. म्यानमार नरसंहारासाठी रोहिंग्यांनी कंपनीवर हेट स्पीचचा आरोप करत ११ लाख कोटींचा खटला दाखल केला होता. तरुण युजर्सवर चुकीचा परिणाम होत असल्याची माहिती मिळूनही कंपनीने काही केले नाही, असे फ्रान्सेस होगॅनने स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियात न्यूज शेअरिंगवर बंदी, ट्रम्प यांना बॅन केल्याने खूप टीका झाली. तज्ज्ञांच्या मते, कंपनीसाठी आता पुनरागमन आव्हानात्मक आहे.

बातम्या आणखी आहेत...