आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनचे अनोखे कुटुंब:प्रत्येक सदस्याला वार्षिक लक्ष्य, तिमाही तसेच साप्ताहिक बैठक, रिव्ह्यूदेखील; यातून जवळीक वाढली, बाँडिंगही सुधारली

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चौधरी कुटुंबाने कॉर्पोरेट कंपन्यांच्या यशाच्या मंत्राने ठरवले कुटुंबाचे महत्त्व

कुटुंबाच्या तिमाही व साप्ताहिक बैठका, पालक व मुलांसाठी वार्षिक लक्ष्य व प्रत्येक सदस्याचा रिव्ह्यू...! एेकून आश्चर्य होते. व्यवसाय कुटुंबाप्रमाणे चालवायचे ऐकले असेल, मात्र कुटुंबाला व्यवसायासारखे चालवण्याचे हे अनोखे उदाहरण ब्रिटनचे आहे. ५७ वर्षांच्या रीता चौधरी त्यांच्या कुटुंबाला असेच ब्ल्यूचिप कंपनीसारखे चालवत आहेत, त्याचा परिणामही उत्साहवर्धक आहे. रीता यांना वाटते की, तणावग्रस्त पालकांनी जगातील यशस्वी कंपन्यांमध्ये रोजच्या कामात वापरली जाणारी संरचना आणि प्रक्रिया स्वीकारायला हवी.

रीता यांच्या कुटुंबात पती जैफ, मुलगा रीज आणि दोन मुली लिया व अन्या आहेत. सुमारे आठ वर्षांपूर्वी रीता यांच्या आई व सासू अचानक सोडून गेल्यानंतर त्या अनौपचारिकरीत्या घरात एचआर डायरेक्टरच्या भूमिकेत आल्या. तेव्हा त्यांनी कुटुंबात या कोचिंग स्ट्रक्चरची अंमलबजावणी सुरू केली. दरवर्षी जानेवारीत कुटुंबातील सदस्यांचे वार्षिक लक्ष्य ठरवले जाते. रीता सांगतात, सर्वांनी मिळून चांगले काम करण्याची ब्ल्यूचिप कंपन्यांची संस्कृती आहे. कुटुंबासारखे नाते असावे, विश्वास, वचनबद्धता व जबाबदारी असावी. याच गोष्टी कौटुंबिक मूल्यांसाठीही महत्त्वाच्या आहेत. चौधरी कुटुंब म्हणते की, यामुळे जवळीक वाढली, संबंध चांगले झाले, सोबत राहून आपण काय करू शकतो हे आम्हाला समजले.

रीता बिझनेस स्टडीज शिकवायच्या व कन्सल्टन्सी फर्ममध्ये सीईओंना शिकवतात. त्यांनी कुटुंबाला व्यवसायाप्रमाणेच चालवण्याची चौकट आखली आहे. प्रमुख मुद्दे असे...
- सायकोमेट्रिक टेस्ट (प्रत्येक सदस्य सक्रिय होण्यासाठी त्याचे व्यक्तिमत्त्व ओळखणे)
- वार्षिक लक्ष्य (आरोग्य, नाते व पैशांबाबत होऊ शकते, जसे लहान मुले असल्यास त्यांना दात स्वच्छ ठेवण्यासाठी दोन वेळा ब्रश करणे)
- तिमाही रिव्ह्यू (यामुळे ठरवलेले लक्ष्य पूर्ण करण्यात अडचण तर येत नाही हे समजेल)
- साप्ताहिक बैठक (यात एखादी नवी समस्या किंवा गेल्या आठवड्यातील कामगिरीवर चर्चा)
- वन टू वन (एखाद्याला पूर्ण कुटुंबासमोर व्यक्त व्हायचे नसेल तर त्याला मदत होईल)
- मेंटरिंग (आपल्या अनुभवातून कुटुंबातील लहान सदस्यांना मजबूत होण्यास मदत करणे)

चौधरी कुटुंबाच्या चार्टरमध्ये १२ मूल्यांवर भर, प्रत्येकाची जबाबदारी निश्चित
रीता सांगतात, आम्ही एका चार्टरमध्ये जबाबदारीचे सिद्धांत लिहिले आहेत.
१. प्रेमळ व स्वच्छ घर २. एकत्र राहणे, यशाचा उत्सव करणे ३. एकमेकांना लक्ष्य पूर्ण करण्यास मदत ४. प्रामाणिकपणा, निष्ठा व विन्रमता ५. विनाअट सर्वांना प्रेम ६. नात्यांमध्ये आदर, परस्परता ७. सकारात्मक विचार, कृतज्ञ असणे ८. मोकळ्या मनाने बोलणे, ऐकणे ९. संकटात मदत १०. व्यायाम व खाण्यापिण्यातून सुदृढ आरोग्य ११. वैयक्तिक विकासावर लक्ष १२. आध्यात्मिकता.

बातम्या आणखी आहेत...