आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील निम्मी लोकसंख्या २०३५ पर्यंत ओव्हरवेट होईल,अर्थात वैद्यकीयदृष्ट्या ती लठ्ठपणाच्या जाळ्यात ओढली जाईल,असा इशारा वर्ल्ड ओबिसिटी फेडरेशनने दिला आहे. संघटनेच्या ताज्या अहवालानुसार, जगातील २.६ अब्ज म्हणजे, ३८% लोकसंख्येचे आधीच अतिरिक्त वजन आहे. मात्र, वर्ल्ड ओबिसिटी फेडरेशननुसार, सध्याचा कल सांगतो की, येत्या १२ वर्षांत ही संख्या वाढून ४ अब्ज म्हणजे, ५१% होईल. अहवालात सांगितले की, नुकसानकारक खाद्य सामग्रीवर बंदी घालण्यासाठी कर लावण्यासारखे धोरणात्मक उपाय योजन्याची गरज आहे. प्रौढांच्या तुलनेत मुले आणि तरुणांमध्ये लठ्ठपणा वेगाने वाढला आहे. २०३५ पर्यंत हा २०२० च्या दराच्या तुलनेत दुप्पट दराने वाढण्याची शक्यता आहे. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये १००% दराने वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे २० कोटी मुले लठ्ठपणाचा बळी ठरू शकतात. मुलींमध्ये लठ्ठपणा वाढण्याचा दर १२५% होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. १७ कोटी मुली लठ्ठपणाच्या जाळ्यात ओढल्या जाऊ शकतात.
लठ्ठपणाची कारणे : अहवालानुसार, हवामान बदल, कोविड निर्बंध, रासायनिक प्रदूषणासोबत नुकसानकारक खाद्य सामग्रीला प्राेत्साहन सांगितले आहे. फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, सरकारे आणि धोरणकर्त्यांनी युवा पिढीला वाचवण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे.
लठ्ठपणाचा खर्च जागतिक जीडीपीच्या ३% च्या समान
जगाला लठ्ठपणाची किंमत चुकवावी लागत आहे. २०१९ मध्ये हा १.९६ लाख कोटी डॉलर होता,जो २०३५ मध्ये वाढून ४.३२ लाख कोटी डॉलर होईल. हा जगाच्या जीडीपीच्या ३% आहे. हा कोविडमुळे झालेल्या नुकसानीसमान आहे. २५ बीएमआय ओव्हरवेट मानले जाते. ३० बीएमआयच्या व्यक्तींना लठ्ठ मानले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.