आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रॅगन पुन्हा अस्वस्थ:चीनमध्ये आणखी एक शहर लॉक, मलेशियात लागू झाली आणीबाणी

बीजिंग3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 50 लाख लोकसंख्येच्या लँगफेंग शहरात सर्वांची तपासणी होणार

एकीकडे जगातील अनेक देशांत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे मात्र अनेक देशांत महामारी विक्राळ रूप धारण करत असल्याचे दिसून येत आहे. त्यात चीनचाही समावेश हाेताे. महामारीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा करणाऱ्याने चीनने मंगळवारी ५० लाख लाेकसंख्या असलेल्या लँगफेंग शहरातही कडक लाॅकडाऊन केला. चीनने अलीकडेच हेबई प्रांतातील एका माेठ्या शहरात लाॅकडाऊन केला हाेता. चीनच्या या निर्णयामुळे देशात दुसऱ्या लाटेची भीती वर्तवली जाते. लँगफेंगमधील नागरिकांना आठवडाभर क्वॉरंटाइन राहण्याची सूचना देण्यात आली आहे. लवकरच येथील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. लँगफेंगच्या सीमेमध्ये येणारे गुआन व सानहेमध्ये आधीपासूनच लाॅकडाऊन सुरू आहे. चीनमध्ये अलीकडेच सर्वाधिक बाधित आढळून येत असलेल्या प्रांतात शिझियाझुआंगचा समावेश आहे. १.१ काेटी लाेकसंख्येच्या या शहरात अतिशय कडक लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. बीजिंगच्या कॅब शेअरिंग सेवेवर बंदी आली आहे. साेबतच चालकांना न्यूक्लिक अॅसिड टेस्ट व डाेस घेण्यास सांगण्यात आले आहे.

डाेस आल्यानंतरही २०२१ मध्ये हर्ड इम्युनिटी नाही : आराेग्य संघटना
काेराेना महामारी वाढल्यानंतर जागतिक आराेग्य संघटनेने २०२१ मध्ये काेराेना हर्ड इम्युनिटीची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. हर्ड इम्युनिटी म्हणजे आजाराबाबत माेठ्या लाेकसंख्येमध्ये अँटिबाॅडी विकसित करण्याची स्थिती हाेय. संसर्गाद्वारे किंवा लसीकरणाद्वारे हे शक्य हाेते. आधी ६० ते ७० टक्के लाेकांनी बाधित व्हावे किंवा त्यांचे लसीकरण करण्यात यावे. हर्ड इम्युनिटी वाढेल, असे गृहीतक मांडले जात हाेते. परंतु आता हेच प्रमाण ८५ ते ९० टक्के असेल तरच हर्ड इम्युनिटी येईल, असा दावा केला जाताे.

नव्या बाधितांच्या वाढत्या विक्रमानंतर मलेशियात राजाने जाहीर केला निर्णय
मलेशियाचा राजाने काेराेना महामारीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात देशव्यापी आणीबाणी लागू केली आहे. या निर्णयामुळे पंतप्रधान मुहयिद्दीन यासिन यांची पकड आणखी बळकट हाेणार असल्याचे मानले जाते. विराेधी पक्ष देशात लवकरच निवडणूक करण्याची मागणी करत हाेते. मलेशियात गेल्या आठवड्यात दरराेजच्या बाधितांची संख्या सरासरी ३ हजारांवर पाेहाेचली हाेती. महामारी सुरू झाल्यापासून असे पहिल्यांदाच घडले आहे. साेमवारी येथे काेराेनाबाधितांची संख्या १.३८ लाखावर गेली.

ब्रिटन : पंतप्रधानांच्या सायकल राइडने देशभरात नागरिक संतप्त
काेराेनाच्या नव्या स्ट्रेनमुळे ब्रिटनमध्ये सध्या लाॅकडाऊन करण्यात येत आहे. लाेकांना दिवसभरात एक वेळ व्यायामासाठी घराबाहेर जाण्याची परवानगी आहे. परंतु घरापासून जास्त दूर जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन मंगळवारी निवासस्थानापासून सुमारे ११ किलाेमीटर अंतरपर्यंत सायकलवर दिसून आले. त्यावरून लाेकांमध्ये संताप हाेता. घरापासून ८ किलाेमीटरवर सायकल चालवणाऱ्या एका महिलेस २०० पाैंड दंड करण्यात आला हाेता.

बातम्या आणखी आहेत...