आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:ब्राझीलमधून आलेल्यांमध्ये आढळले कोरोनाचे आणखी एक स्वरूप : जपान

शोको ओडा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राझीलमधून आलेल्या चार प्रवाशांमध्ये कोरोनाचे एक नवे स्वरूप (स्ट्रेन) आढळले. ते इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या स्वरूपासारखेच असल्याचे जपानच्या राष्ट्रीय संसर्गजन्य रोग संस्थेने (एनआयआयडी) म्हटले आहे.

एनआयआयडीने रविवारी सांगितले की, कोरोनाच्या या रूपाच्या आनुवंशिक संरचनेबाबत जास्त माहिती नाही. यामुळे हा स्ट्रेन किती संसर्गजन्य आहे व सध्याच्या लसी त्यावर किती परिणामकारक आहे हे ठरवणे अद्याप तरी कठीण आहे.

मुंबईतील तीन रुग्णांत आढळला अँटिबॉडीचा परिणाम न होणारा स्ट्रेन
मुंबई : मुंबईत कोरोनाच्या तीन रुग्णांमध्ये कोरोनाचे असे स्वरूप आढळले आहे, ज्यावर अँटिबॉडीचाही (विषाणूशी लढण्यासाठी शरीरात निर्माण होणारे विशेष प्रोटिन्स) परिणाम होत नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser