आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभूतपूर्व आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेत राष्ट्रपतींविरुद्ध निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी आणीबाणी मागे घेतली आहे. तथापि, औषधांच्या टंचाईमुळे वैद्यकीय आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान, राष्ट्रपती राजपक्षे यांनी राजीनामा न देण्याची घोषणा केली. मुख्य सरकारी प्रवक्ता व महामार्गमंत्री जॉन्स्टन फर्नांडिस यांनी संसदेत सांगितले की,‘राष्ट्रपती हे निवडून आलेले आहेत. त्यामुळे ते राजीनामा देणार नाहीत.’ श्रीलंकेत आणीबाणी हटवली, राष्ट्रपती राजीनामा देणार नाहीत
श्रीलंकेनंतर आता नेपाळमध्ये विदेशी चलन साठा घटला आहे. नेपाळच्या केंद्रीय बँकेने इतर बँकांना वाहने आणि अनावश्यक साहित्यासाठी लेटर ऑफ क्रेडिट जारी करू नये असे सांगितले आहे. त्यात बहुतांश आयात भारतातून होते. दरम्यान, नेपाळ राष्ट्र बँकेच्या संशोधन विभागाचे प्रमुख प्रकाशकुमार श्रेष्ठ यांनी म्हटले की, चैनीच्या वस्तूंवर खर्च करण्याऐवजी औषधांच्या आयातीसाठी परकीय चलन साठा ठेवावा लागेल. आयात कमी करण्याचे इतर उपाय निष्फळ ठरल्यानंतर हे निर्देश जारी करण्यात आले. तथापि, नेपाळ केंद्रीय बँकेचे प्रवक्ता गुनाखर भट्ट यांनी श्रीलंकेसारखी स्थिती होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
जुलै २०२१ मध्ये नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस नेपाळमध्ये आयात वाढल्याने आणि बाहेरून येणारा निधी कमी झाल्याने, पर्यटनातून मिळणारे उत्पन्न तसेच निर्यातीच्या उत्पन्नात घसरण झाल्याने विदेशी चलनाचा साठा कमी होत आहे. जुलै २०२१ मध्ये तो ११.७५ अब्ज डॉलरवरून १७% नी घटून ९.५९ अब्ज डॉलर एवढाच उरला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.