आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान व त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्या लाचखोरीचे एक नवे प्रकरण उजेडात आले आहे. बुशरा बीबींचा 2 मिनिट 17 सेकंदांचा एक ध्वनिफित व्हायरल झाली आहे. त्यात त्या एक कंत्राट मिळवून देण्याच्या मोबदल्यात उद्योगपती मलिक रियाज व त्यांची मुलगी अंबर यांच्याकडून 5 कॅरेटच्या हिऱ्याची मागणी करताना ऐकावयास मिळत आहेत.
विशेष म्हणजे यातही बुशरा यांची मैत्रीण फराह खान उर्फ फराह गोगी यांची चर्चा होत आहे. इम्रान यांचे सरकार कोसळण्यापूर्वीच फराह यांनी दुबईत पलायन केले आहे.
प्रथम प्रकरण समजून घ्या
दोन दिवसांपूर्वी पाकचे सर्वात मोठे भूखंड माफिया मलिक रियाज व त्यांची मुलगी अंबर रियाज याची एक ऑडिओ क्लिप उजेडात आली होती. त्यात अंबर आपल्या वडिलांना पंजाबीत म्हणते -'माझी फराह गोगी यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी बुशरा बाबींना 3 नव्हे तर 5 कॅरेटची डायमंड रिंग हवी असल्याचे सांगितले आहे. रिंग त्या स्वतः करवून घेतली. पण, त्याचे पेमेंट आपल्याला करावे लागेल. बुशरा व फराह यांनी इम्रान खान साहेबांशीही चर्चा केली आहे. ते कंत्राटाच्या सर्वच फायली तत्काळ हातावेगळ्या करतील.' त्यावर मलिक रियाज म्हणतात -'काही अडचण नाही. 5 कॅरेटची हिऱ्याची अंगठी देऊन टाकू.'
अब्जावधींचे कंत्राट मिळाले
पाकिस्तानी पत्रकार गौहर बट्ट म्हणतात -'कराचीत एक अब्ज रुपयांचा हाउसिंग प्रकल्प पास झाला आहे. मलिक रियाज यांना या प्रकल्पाचा ठेका हवा होता. त्यांची फाईल पुढे सरकत नव्हती. त्यामुळे त्यांनी फराह खान यांच्या माध्यमातून बुशरा बीबींशी संपर्क साधला. बुशरांनी यासाठी इम्रान यांना तयार करुन अब्जावधींच्या कंत्राटातील कोट्यवधीच्या लाचेचा मार्ग मोकळा केला. विशेष म्हणजे ही डायमंड रिंग बुशरा यांनी घातल्याचेही उजेडात आले आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.'
इम्रान व त्यांच्या पत्नीने सरकारी तिजोरीतील अनेक मौल्यवान भेटवस्तूंची विक्री केली होती. स्वतः इम्रान यांनी हे कबूल केले आहे. त्यांनी या सर्व वस्तू आपल्याला भेट म्हणून मिळाल्याचे म्हटले होते.
कोण आहे मलिक रियाज
रियाज पाकचे एक श्रीमंत उद्योगपती आहेत. लष्कर, आयएसआय व सरकार या तिन्ही ठिकाणी त्यांचे हस्तक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा आसिफ अली झरदारी यांच्यासोबत झालेला संवादही असाच व्हायरल झाला होता. त्यात ते इम्रान व झरदारी यांच्यात सुसंवाद स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावर झरदारींनी त्यांना झिडकारल्याचेही त्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकावयास येत होते.
उल्लेखनीय बाब म्हणजे रियाज यांच्या एका सहकाऱ्याकडून गतवर्षी लंडनध्ये 40 अब्ज रुपयांची रोकड जप्त करण्यात आले होते. ब्रिटीश सरकारने ही रकम पाकला सुपूर्द केली होती. त्यावर इम्रान आपल्या कॅबिनेटला म्हणाले होते -'ही एक सीक्रेट डील आहे.' नंतर या पैशाचे काय झाले याची कोणतीच माहिती उजेडात आली नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.