आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Antarctica Iceberg A 76 | World's Largest Iceberg A 76 Breaks Off In Antarctica Its Half The Size Of Puerto Rico.

अंटार्कटिका:संशोधकांना सापडला 17 किमी लांबी आणि 25 किमी रुंदी असलेला जगातील सर्वात मोठा हिमखंड

लंडन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंटार्कटिकामध्ये जगातील सर्वात मोठा हिमखंड सापडला आहे. संशोधकांनी या हिमखंडाला A-76 नाव दिले आहे. वृत्त संस्थेने सांगितल्यानुसार, या हिमखंडाची लांबी 170 किलोमीटर आणि रुंदी 25 किलोमीटर आहे.

सॅटेलाइटद्वारे आकार कळाला

A-76 हिमखंडाच्या आकाराचा अंदाज तिथे काम करणाऱ्या संशोधकांनाही नव्हता. याचा आकार जाणून घेण्यासाठी सॅटेलाइट मेजरमेंट टेक्नोलॉजीची मदत घेण्यात आली. यातून समजले की, हा हिमखंड जगातील सर्वात मोठा हिमखंड आहे. हा हिमखंड अंटार्कटिकाच्या रोनी आइस सेल्फपासून वेगळा झाला आहे आणि आता वेडेलच्या समुद्रात तरंगत आहे. यूरोपीय स्पेस एजेंसी यावर रिसर्च करत आहे. या हिमखंडाबाबत अजून माहिती येत्या काही दिवसांत मिळेल.

लॉन्ग आयलंडपेक्षा मोठा
रिपोर्ट्सनुसार, आकारात हा हिमखंड न्यूयॉर्कमधील लॉन्ग आयलंडपेक्षा मोठा आहे, तर प्यूर्टो रिकोच्या एकूण क्षेत्रफलाच्या अर्धा आहे. संशोधकांनी सांगिल्यानुसार, अंटार्कटिकेची आइसशीट ग्लोबल वार्मिंगमुळे विरघळत आहे आणि यामुळेच हा हिमखंड वेगळा झाला आहे. काही दिवसात या हिमखंडाचे तुकडे होतील.

बातम्या आणखी आहेत...