आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Anti French Outcry In 10 Countries With Large Muslim Populations; Thousands Of People On The Streets In Dhaka

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पैगंबर यांच्या व्यंगचित्रावरून वादंग:मोठ्या मुस्लिम लोकसंख्येच्या 10 देशांत फ्रान्सविरोधी आक्रोश; ढाक्यात हजारो लोक रस्त्यावर

इस्लामाबाद / ढाकाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र बांगलादेशची राजधानी ढाक्याचे आहे. मंगळवारी हजाराे लाेक फ्रान्स सरकारच्या विराेधात रस्त्यावर उतरले हाेते. त्यांनी वस्तूंवर बहिष्काराची मागणी केली व मॅक्राॅन यांचा पुतळा जाळला.
  • कतार, साैदी अरेबिया, जाॅर्डन, लिबिया, सिरिया, कुवेत, गाझाचा फ्रान्सच्या वस्तूंवर बहिष्कार

प्रेषितांच्या व्यंगचित्रावरून माेठी मुस्लिम लाेकसंख्या असलेल्या १० पेक्षा जास्त देशांत संतापाची लाट उसळली आहे. सर्वात आधी तुर्कीने या प्रकरणात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राॅन यांच्या वक्तव्यावर टीका केली. त्यानंतर कतार, साैदी अरेबिया, जाॅर्डन, लिबिया, सिरिया, कुवेत, गाझाने फ्रान्सच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली. आता पाकिस्तान व इराणच्या संसदेने फ्रान्सच्या विराेधात प्रस्ताव पारित केला आहे. पाकिस्तानच्या संसदेने प्रस्तावात फ्रान्सहून पाकिस्तानच्या राजदूतास मायदेशी बाेलावण्याची मागणी केली आहे. त्याचबराेबर सरकार तसेच इतर मुस्लिम देशांनी फ्रान्सच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. सरकारने इस्लामाबादमध्ये फ्रान्सच्या राजदूतांना बाेलावून निषेध केला. दुसरीकडे प्रस्ताव पारित झाल्याच्या काही तासांतच पाकिस्तानची वृत्तवाहिनी जिअाे इंग्लिशने साेशल मीडियावर फ्रान्समध्ये पाकिस्तानचा राजदूत नसल्याचा दावा केला. वास्तविक पाकिस्तानने तीन महिन्यांपूर्वी राजदूत माेईन-उल-हक यांची चीनमध्ये बदली केली हाेती. मात्र त्याची यादी संसदेत देण्यात आली नव्हती. मॅक्राॅन यांनी इस्लाम समजून न घेताच हल्ला केला आहे, अशी टीका आदल्या दिवशी पंतप्रधान इम्रान खान यांनी केली हाेती.

इराणकडून विराेध

इराणच्या संसदेनेदेखील फ्रान्स सरकारच्या विराेधात प्रस्ताव पारित केला. इस्लामविषयी लाेकांमधील वाढते आकर्षण राेखण्याचा राष्ट्राध्यक्ष मॅक्राॅन यांचा इरादा आहे. मात्र मॅक्राॅन आपल्या प्रयत्नात यशस्वी हाेणार नाहीत. मुस्लिम राष्ट्रे इस्लाम व प्रेषितांच्या अपमानाविराेधात उभी राहतील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अपमान करणे यावरून फ्रान्स सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागते, असे प्रस्तावात म्हटले आहे. त्याचबराेबर परराष्ट्र मंत्रालयाने फ्रेंच राजदूतास पाचारण करून मॅक्राॅन यांच्या वक्तव्याचा निषेध नाेंदवला. त्यावर फ्रान्सची प्रतिक्रिया आली नाही. इराकची राजधानी बगदादमध्येही मॅक्राॅन यांच्याविराेधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. येथे महिलादेखील निदर्शनांत सामील झाल्या.

वाद : शिक्षकाच्या हत्येनंतर फ्रान्सची कडक कारवाई

काही दिवसांपूर्वी प्रेषितांचे कार्टून दाखवल्यानंतर फ्रान्समध्ये एका शिक्षकाची हत्या झाली हाेती. त्यानंतर फ्रान्समध्ये व्यापक निदर्शने झाली हाेती. शिक्षकाची हत्या हा दहशतवादी हल्ला असल्याचे वक्तव्य मॅक्राॅन यांनी केले हाेते. त्याचबराेबर त्यांनी इस्लामिक कट्टरवादी संघटनांवर कडक कारवाईचीदेखील घाेषणा केली हाेती.