आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी अधिकाऱ्यांच्या कुटुंबाची सेफ हाऊसमध्ये रवानगी |:हिजाबविरोधी संतापाची लाट तीव्र; तख्तपालटाची शक्यता वाढली

तेहरान2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराणमध्ये हिजाबविरोधातील आंदोलनाचे लोण मंगळवारी ३५ हून जास्त शहरांत पसरले. त्यामुळे तख्तपालटाची शक्यता वर्तवली जाते. त्यातच इराणचे सैन्य रिव्हॉल्युशनरी गार्ड‌्सच्या टॉप कमांडरने आपल्या कुटुंबांना सेफ हाऊसमध्ये हलवले आहे. इराणमधील एका तेल कंपनीच्या विश्रामगृहात या लष्करी परिवाराची व्यवस्था केली आहे. तेथे कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. निदर्शने सुरू राहिल्यास किंवा तख्तपालट झाल्यास त्यांना सुरक्षितपणे शेजारच्या जॉर्जियामध्ये हलवण्यात येईल, असा विश्वास या कुटुंबांना देण्यात आला आहे. राष्ट्रपती रहिसी यांच्या सरकारने निदर्शकांवर अनेक शहरांत बळाचा वापर केला. त्यामुळे मृतांची संख्या ८० वर पोहोचली आहे. ५०० लोक जखमी झाले आहेत. सुमारे दोन हजारांहून जास्त लोक अटकेत आहेत. इराणच्या मॉरल पोलिसांच्या ताब्यात असताना महाशा अमिनी या तरुणीचा मृत्यू झाला होता. या तरुणीच्या समर्थनासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

मुख्य न्यायमूर्तींची कबुली, इराणी पोलिसांचे मनोधैर्य खचलेय इराणचे मुख्य न्यायमूर्ती मोहसेनी ऐजी यांनी देशातील परिस्थितीबद्दलचे वास्तव स्वीकारले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या निदर्शनांमुळे पोलिसांचे मनोबल खचले आहे. एका व्हायरल व्हिडिआेमध्ये ऐजींचे फोनवरील संभाषण ऐकायला मिळते. सुट्या मिळत नसल्याने पोलिस थकून गेले आहेत. निदर्शकांना आटोक्यात आणण्यातही त्यांना यश मिळालेले नाही. मुख्य न्यायमूर्ती महत्त्वाचे :इराण सरकारमध्ये सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी, राष्ट्रपती इब्राहिमी रहिसी यांच्यानंतर मुख्य न्यायमूर्तींचे स्थान महत्त्वाचे आहे.

१५ विद्यापीठांत बहिष्कार तेहरानसह १५ विद्यापीठांत हिजाबविरोधी निदर्शनांमुळे विद्यार्थ्यांनी तासिकांवर बहिष्कार घातला. मंगळवारीही निदर्शने झाली

कुख्यात तुरुंगात निदर्शकांची हत्या होईल, पत्रकाराचा संशय हिजाबविरोधी निदर्शकांना तेहरानमधील कुख्यात करचक तुरुंगात डांबण्यात आले आहे. अशा तुरुंगातील निदर्शकांची हत्या केली जाऊ शकते, असा संशय फोटोजर्नालिस्ट याल्दा मोयारी यांनी व्यक्त केला आहे. या तुरुंगातील गुप्त फुटेज त्यांनी जाहीर केले आहे. ते आॅडिओ स्वरूपात आहे. निदर्शकांना वेळेवर पाणी, भोजन मिळत नाही. म्हणूनच त्यांची हत्या होऊ शकते.

करचक तुरुंग : इस्लामी सरकारच्या विरोधकांना या तुरुंगात कैद केले जाते. दरवर्षी या तुरुंगात ५५ विरोधकांना संपवले जाते, असे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले.

बातम्या आणखी आहेत...