आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कोरोनामुक्त झाल्यावर लसीच्या 2 डोसइतकी अँटिबॉडी, रॉकफेलर विद्यापीठाचे संशोधन

न्यूयॉर्क3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड-१९ नंतर शरीरात निर्माण होणारी अँटिबॉडी किंवा लस घेतल्यानंतरची अँटिबॉडी यापैकी कोण अधिक सुरक्षा देते, हा गुंता शास्त्रज्ञ सोडवू पाहत आहेत. दरम्यान, रॉकफेलर विद्यापीठात झालेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले की, कोविड-१९ मधून बरे झालेल्या लोकांत लसीकरण झालेल्यांच्या तुलनेत अधिक अँटिबॉडी निर्माण होतात. एवढेच नव्हे तर या अँटिबॉडी कोरोनाच्या कोणत्याही व्हेरिएंटला मात देण्यात सक्षम आहेत.

नेचर नियतकालिकात प्रकाशित संशोधनानुसार, जगभरात लसीकरण सुरू झाल्यानंतर संशोधकांनी लसीच्या प्रभावावर संशोधन केले. फिलाडेल्फियातील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील इम्युनोलॉजिस्ट ऋषी गोयल यांच्या मते, जे लोक कोरोनातून बरे झाले त्यांच्यात लसीच्या दोन डोसच्या बरोबरीने अँटिबॉडी निर्माण झाली. ही हायब्रिड इम्युनिटी होय. अशा लोकांवरील अभ्यासात आढळले की, त्यांचे सीरम (रक्तातील अँटिबॉडी निर्माण करणारा भाग) आक्रमक विषाणूंना निष्क्रिय करण्यात अधिक प्रभावी ठरले. तथापि, हे अँटिबॉडीच्या उच्च स्तरामुळे झाले की इतर गुणांमुळे ते अजून स्पष्ट झाले नाही. अलीकडच्या संशोधनानुसार हायब्रिड इम्युनिटी अंशत: बी सेल्समुळे येते. संक्रमण किंवा लसीकरणानंतर निर्माण होणाऱ्या अँटिबॉडीची संख्या प्लाझ्माब्लास्ट्स सेल्समुळे तयार होते. जेव्हा या पेशी अचानक संपुष्टात येतात तेव्हा अॅँटिबॉडीचा स्तरही खालावतो. एक वेळ प्लाझ्माब्लास्ट्स संपल्यावर अँटिबॉडीचा मुख्य स्रोत अत्यंत दुर्लभ मेमोरी बी पेशी बनतात. ज्या संक्रमण किंवा लसीकरणापासून सुरू होतात. गोयल यांच्या मते संक्रमित व्यक्तींना दिलेला पहिला डोस कधीही संक्रमित न झालेल्या व्यक्तीला दिलेल्या दुसऱ्या डोसइतकाच प्रभावी ठरतो.

कोविड संक्रमणापासून बचाव गरजेचा : एका दुसऱ्या संशोधनानुसार हायब्रिड इम्युनिटीच्या लोकांमध्ये कधीही संक्रमित न झालेल्या लोकांच्या तुलनेत ७ महिने उच्च स्तरापर्यंत राहील एवढी अँटिबॉडी तयार होते. बोस्टनच्या हार्वर्ड मेडिकल स्कूलचे इम्युनोलॉजिस्ट डुआन वेसमान यांच्या मते, हायब्रिड इम्युनिटीच्या लोकांत अँटिबॉडीचा स्तर अधिक स्थिर राहतो. तज्ज्ञांच्या मते त्याचे फायदे काहीही असोत, पण सॉर्स-कोव-२ संक्रमणापासून बचाव गरजेचा आहे. आधी कोणी संक्रमित व्हावे आणि नंतर त्यांनी लस घ्यावी, असे आम्ही म्हणणार नाही.

बूस्टर डोसमुळे हायब्रिड इम्युनिटी : पॅरिसच्या नेकर इन्स्टिट्यूट फॉर सिक चिल्ड्रनचे इम्युनोलॉजिस्ट मॅथ्यू मॅहेवास म्हणाले, जे कधी संक्रमित झालेच नाहीत तरीही लसीचा तिसरा डोस घेतील तर त्यांच्यात हायब्रिड इम्युनिटी तयार होईल.

यामुळे घटलेे ब्राझील-दक्षिण अमेरिकेतील रुग्ण
कतारच्या संशोधकांचे म्हणणे आहे की, ज्या लोकांनी संक्रमणानंतर फायझर किंवा बायोएनटेकची लस घेतली त्यांना संक्रमण न झालेल्या लोकांपेक्षा संक्रमणाचा धोका कमी आहे. ब्राझीलचे व्हायरोलॉजिस्ट गोंजालो बेलो बेंटान्कोर म्हणाले की, ब्राझील आणि द. अमेरिकेतील नवीन रुग्णांची संख्या हायब्रिड इम्युनिटीमुळेच घटले असण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...