आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्क:अमेरिकेत नवजात बाळाच्या रक्तात सापडल्या कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या अँटिबॉडीज

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मातेने तीन आठवड्यांपूर्वी घेतली होती कोरोनाची लस, तज्ज्ञांचीही पुष्टी

जन्मताच रक्तामध्ये कोरोनाशी लढणाऱ्या अँटिबॉडीज (प्रतिपिंडे) असलेले जगातील पहिले मूल अमेरिकेतील फ्लोरिडात जन्मले आहे. याला तज्ज्ञांनीही दुजोरा दिला असून यामुळे कोरोनाच्या महामारीत नवी आशा पल्लवित झाली आहे. शरीरात कोणत्याही विषाणूंशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या प्रथिनांना अँटिबाॅडीज संबोधले जाते.

कोणत्याही नवजात बालकाच्या रक्तामध्ये कोरोनाशी लढणाऱ्या या अँटिबॉडीज आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. फ्लोरिडा अटलांटिक विद्यापीठातील तज्ज्ञांनी हे मूल जन्मताच त्यांच्या नाळेतील रक्ताची तपासणी केली होती. अभ्यासक पॉल गिल्बर्ट आणि चेड रुडनिक यांनी यासंदर्भात एक संशोधन अहवाल तयार केला आहे. यात अँटिबाॅडीज सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. या मातेच्या प्रसूतीपूर्वी तीन आठवडे अगोदर तिला कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला होता. यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस देण्यात आला. तोवर मूल (मुलगी) जन्माला आले होते. यानंतर मातेने बाळाला सतत स्तनपान दिले होते. अर्थात, या बाळाच्या रक्तामध्ये सापडलेल्या अँटिबाॅडीज त्याला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यात किती परिणामकारक ठरतील हे अद्याप स्पष्ट व्हावयाचे आहे. याबाबत अजून बरेच संशोधन व्हावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...