आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिकी माऊससह हॉलीवूड चित्रपट कॉपीराइटमुक्त:हास्य नायकाचा वापर आता कोणीही करू शकेल

अमेरिकाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत कॉपीराइटच्या नवा काळ सुरू होत आहे. १९२० च्या दशकात साहित्य, कला, संगीत आणि चित्रपटांत केलेल्या सर्जनशील कामाचा वापर आता कुणीही करू शकेल. सर्वसाधारपणे एखाद्या कलाकृतीचे कॉपीराइट ९५ वर्षे राहते.

हॉलीवूडची बौद्धिक संपदाही लोकांना सहज उपलब्ध आहे. यापैकी काही कलाकृती अद्यापही मौल्यवान मानल्या जातात. जानेवारीमध्ये विनी द पूहचे कॉपीराइट संपले. त्यानंतर हे भालू मोबाइल फोनच्या जाहिरातीत आले. लेखक ए.ए.मिल्ने यांनी मुलांच्या पुस्तकात पूहची रचना केली होती. डिस्नीने त्यावर अनेक चित्रपट केेले. १९२७ मध्ये प्रदर्शित वॉर्नर ब्रदर्सचा चित्रपट द जाज सिंगर जानेवारीत कॉपीराइटमधून बाहेर पडेल. यामुळे वॉर्नर ब्रदर्सना कोणतीही चिंता नाही. मात्र, एक वर्षानंतर मिकी माउसचा पहिला चित्रपट स्टीमबोट विलीचे हक्क संपुष्टात येतील. हे पात्र डिस्नी कंपनीच्या व्यवसायाचा मुख्य भाग आहे. कंपनी यातून वार्षिक ४० हजार कोटी रुपयांहून जास्त कमावते. २०३० मध्ये डिस्नीचे चित्रपट स्नो व्हाइट, बांबी आणि फेंटेसिया कॉपीराइटमुक्त होतील. कॉमिक बुक हिरोही या कक्षेतून बाहेर पडेल. वॉर्नर ब्रदर्सची योजना बॅटमॅनचा नवा सीक्वल करण्याची आहे. तरीही २०३५ मध्ये कोणीही याची निर्मिती करू शकेल. हॉलीवूड निर्मात्यांना ९५ वर्षांच्या अवधीही कमी वाटत असावा. इंग्लंडमध्ये तयार पहिल्या कॉपीराइटमध्ये क्रिएटिव्ह कामाचा हक्क २८ वर्षे होता.

इंटरनेटने लॉबिंगच्या शक्ती संतुलनात बदल केला इंटरनेटने लॉबिंगच्या शक्ती संतुलनात बदल केला आहे. प्रकाशक, संगीत कंपन्या व चित्रपट स्टुडिओ कायम कॉपीराइटचा काळ वाढवण्याची मागणी करतात. दुसरीकडे,गुगल, यूट्यूब अन्य लोक कंटेंट शेअर करून पैसा कमावतात.

बातम्या आणखी आहेत...