आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅलिफोर्नियात अॅपल फायर:लॉस एंजलिसच्या उंबरठ्यावर संकट; 12 हजार एकरांत वणवा, 8 हजार लोकांना हलवले

लॉस एंजलिसएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वणवा विझविण्यासाठी 750 सुपरटँकरने रसायनांचा शिडकावा

अमेरिकेत कॅलिफोर्नियात वणव्याने हाहाकार माजवला. उष्णतेमुळे सुमारे १२ हजार एकर क्षेत्रात अग्नितांडव पाहायला मिळत आहे. स्थानिक लोक त्याला अॅपल फायर असे संबोधतात. शुक्रवारी छोटे लोट होते. चेरी खोऱ्यातून वणवा सुरू झाला होता. आता हा वणवा लॉस एंजलिसपासून १०० किलोमीटरपर्यंत येऊन पोहोचला आहे. हा वणवा रविवारी उशिरा लॉस एंजलिसपर्यंत पोहोचू शकतो, असा इशारा अग्निशमन दलाने दिला आहे. सुरक्षा दलाने २ हजार ५८६ घरांतील सुमारे ८ हजारांवर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.

जुलैमध्ये जास्त घटना : कॅलिफोर्नियाच्या वन विभागाच्या मते जुलै महिन्यात आगीच्या ५ हजार २९२ घटना घडल्या. त्यामुळे सुमारे ७८ हजार एकरवरील वनक्षेत्र खाक झाले. अग्निशमन दल रात्रंदिवस आगीवर नियंत्रणासाठी प्रयत्न करत आहे. सुमारे १७०० अग्निशमन कर्मचाऱ्यांना या संवेदनशील भागात तैनात केले आहे.

बातम्या आणखी आहेत...