आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅनफ्रान्सिस्को:पेगासस स्पायवेअर बनवणाऱ्या एनएसओ कंपनीवर ॲपलचा खटला; युजर्सला लक्ष्य केल्याचा आरोप

सॅनफ्रान्सिस्को11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ॲपल या अमेरिकेच्या कंपनीने जगभरात हेरगिरीसाठी वापरला जाणारा पेगासस स्पायवेअर बनवणारी इस्रायलची कंपनी एनएसओ ग्रुपविरुद्ध खटला दाखल केला आहे. एनएसओने आपल्या युजर्सला लक्ष्य केल्याचा आरोप ॲपलने केला आहे.

पेगासस स्पायवेअरद्वारे जगभरातील अनेक देशांतील पत्रकार, राजकीय नेते आणि इतर लोकांच्या फोनवर पाळत ठेवण्यात आल्याचा आरोप झाला होता. भारतात सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे.

ॲपलव्यतिरिक्त अमेरिकेनेही इस्रायली सॉफ्टवेअर कंपनी एनएसओ ग्रुप आणि कँडिरूला ब्लॅकलिस्ट केले आहे. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने दोन्ही कंपन्यांचा ट्रेड ब्लॅकलिस्टमध्ये समावेश करत त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचा करार करण्यावर बंदी घातली आहे. या कंपन्या आता अमेरिकेत व्यापार करू शकत नाहीत. एनएसओवर २०१९ मध्ये फेसबुकनेही एक खटला दाखल केला होता. त्यात फेसबुकने व्हॉट्सॲप युजर्सना लक्ष्य केल्याचा आरोप केला होता.

बातम्या आणखी आहेत...