आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूयॉर्क:टीका करणाऱ्या ब्लॉगवरच अॅपल बनवत होती वेबसिरीज, टिम कुक यांच्या नाराजीनंतर काम थांबले

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अॅपलच्या उत्पादनांची माहितीही लीक करत होता ब्लॉग

एखाद्याविरोधात वाईट लिहिण्या-बोलण्याआधी याचा विचार नक्कीच करा की, भविष्यात याचा परिणाम तुुमच्या विरोधातही जाऊ शकतो. एकेकाळी खूप लोकप्रिय असणारी ही गोष्ट अमेरिकी ब्लॉग गावकरलाही शंभर टक्के लागू होते. गावकरचा प्रारंभ, लोकप्रिय होणे आणि बंद होण्याची कथा वेबसिरीजच्या रूपात सादर करण्याची योजना टेक कंपनी अॅपलची होती. ही बाब अॅपलचे सीईओ टिम कुक यांना समजली. कुक यांनी या सिरीजबाबत नाराजी व्यक्त केली आणि अॅपलने यावरील काम थांबवले.

खरे म्हणजे गावकरने एकेकाळी अॅपल व टिम कुक यांच्याविरोधात खूप लिहिले होते. गावकरनेच सर्वात आधी टिम कुक समलैंगिक असल्याचा दावा केला होता. तसेच गावकरने अॅपलचे आयफोन-४ चा प्रोटोटाइप फोनच्या लाँचिंगच्या खूप आधी लीक केला होता. गावकरच्या दोन माजी दिग्गजांनी या वेबसिरीजची कल्पना अॅपल टीव्ही प्लसला दिली होती. यातील एक कोर्ड जॉन्सन आणि दुसरे मॅक्स रीड होते. जॉन्सन यांनी टीव्ही लिखाणासाठी गावकर सोडले होते, तर रीड गावकरचे माजी मुख्य संपादक होते. तसेच अॅपलने गावकरच्या आणखी दोन माजी संपादकांना प्रकल्पात सामील केले होते. मात्र, ही गोष्ट टीम कुक यांना समजताच सर्व काही थांबले.

खटले दाखल झाल्यामुळे चार वर्षांपूर्वी बंद झाला होता गावकर ब्लॉग
गावकर त्या काळात दिग्गज कंपन्या आणि प्रख्यात लोकांवरील लिखाणामुळे आणि स्कूपमुळे चांगलेच लोकप्रिय झाले होते. त्यात अशा गोष्टी लिहिल्या होत्या, ज्या मुख्य प्रवाहातील माध्यमे लिहीत नव्हती. यामुळे गावकरवर अनेक खटले दाखल झाले. शेवटी २०१६ मध्ये असाच एक खटला दाखल झाल्याने तो बंद झाला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser