आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभविष्यातील इंटरनेटचा वापर आणि याच्याशी संबंधित कंपन्यांचे बिझनेस मॉडेल कसे असेल यावर जगातील दोन दिग्गज कंपन्यांच्या सीईओंचा दृष्टिकोन परस्परविरोधी आहे. प्रायव्हसीसारख्या काही प्रकरणांत अॅपलचे टिम कुक आणि फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग यांचा दृष्टिकोन एकमेकांना नुकसान पोहोचवणारा आहे. झुकेरबर्ग आणि कुक यांच्या दृष्टिकोनातील संघर्ष शत्रुत्वाच्या पातळीपर्यंत पोहोचला आहे. हे शत्रुत्व अाजचे नव्हे तर अनेक वर्षे जुने आहे.
अनेकदा अनेक विषयांत जगातील हे दिग्गज उद्योगपती परस्परांशी भिडले आहेत. ६० वर्षीय कुक अनुभवी व्यक्ती आहेत. त्यांनी कुशल पुरवठा साखळीद्वारे अॅपलला या टप्प्यापर्यंत आणले आहे. ३६ वर्षी झुकेरबर्ग हार्वर्ड ड्रॉप आऊट असून त्यांनी सोशल मीडिया साम्राज्य उभे केले आहे. अॅपलचे सीईओ खूप दिवसांपासून प्रायव्हसीच्या मुद्द्यावर फेसबुकवर टीका करत असून त्यांच्यातील शत्रुत्वाचे हे प्रमुख कारण आहे. न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या अलीकडच्या लेखात या दोन दिग्गजातील शत्रुत्वाचे कारण सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
दोन टेक दिग्गजांमधील वादाचे ताजे कारण
अॅपलच्या आयओएस १४.५ ऑपरेटिंग सिस्टिम असणाऱ्या युजरकडे पर्याय असेल की, ते फेसबुकसारख्या अॅपने त्यांना ट्रॅक करू द्यावे की नाही.अॅपल याला ट्रॅकिंग ट्रान्सपरन्सी संबोधते. आयफोनच्या या बदलामुळे फेसबुकच्या टार्गेटेड जाहिरातीतून होणाऱ्या ६४ लाख कोटी रुपयांहून अधिकच्या वार्षिक उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो.फेसबुक अॅपलच्या नव्या नियमाविरुद्ध मोहीम राबवत आहे. ते वृत्तपत्रांत जाहिरात देऊन व फेसबुकमध्ये पॉप अप चालवून लोकांना ट्रॅकिंसाठी प्रोत्साहित करत आहे.
एकमेकांवर बऱ्याचदा निशाणा साधताहेत दोन दिग्गज
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.