आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Appointed Chief Heat Officer In The Greek Capital, Work To Make The City Environmentally Friendly; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:ग्रीसच्या राजधानीत चीफ हीट आॅफिसर नियुक्त, शहर वातावरणानुरूप सुसह्य करण्याचे काम!

अॅथेन्स3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अधिकारी नियुक्त करणारे अॅथेन्स दुसऱ्या क्रमांकाचे शहर

ग्रीसच्या अॅथेन्समध्ये मुख्य तापमान अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अॅथेन्स अशा प्रकारची नियुक्ती करणारे युराेपातील पहिले व जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. अॅथेन्सच्या अगाेदर याच वर्षी अमेरिकेच्या मियामी-डेडमध्ये चीफ हीट आॅफिसरची नियुक्ती करण्यात आली हाेती.मुख्य तापमानसंबंधी अधिकारी जास्त तापमान तसेच उष्णतेच्या लाटेच्या दृष्टीने शहरासाठी हवामान अनुकूल करण्याचा प्रयत्न करेल. हा अधिकारी शहराला थंड करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययाेजना करेल.

इमारतींमधील एसीसारख्या उपायांचा त्यात समावेश नसेल. कारण एसीसारखी यंत्रे कृत्रिम ऊर्जेवर चालतात. एवढेच नव्हे तर हवामान बदलाचे संकटही वाढत आहे. त्याएेवजी झाडे लावून आणि शेती वाढवून शहराला थंड ठेवले जाईल. रस्ते, इमारतींची डिझाइन सुधारली जाईल. त्यांच्या बांधकामात तापमान वाढ करणाऱ्या सामग्रीचा वापर केला जाणार नाही. अॅथेन्समध्ये पहिल्यांदाच हवामान खराब असल्याने त्याची माहिती देण्यासाठी अॅपचा वापर केला जाताे. तापमान वाढीदरम्यान अॅप अशी परिस्थितीत राहण्यायाेग्य माहिती देईल.

अॅथेन्स प्रशासनाने अमेरिका, कॅनडा व युराेपातील घटनांतून धडा घेतला. येथे काही दिवसांपासून खूप जास्त तापमान व उष्णतेच्या लाटेची प्रतीक्षा केली जात आहे. शेकडाे लाेकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत तापमान वाढीमुळे वनक्षेत्रातील वणव्याच्या घटनांत वाढ दिसून आली. युराेपमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे २०१८ मध्ये १,०४,००० लाेकांचा मृत्यू झाला.

जास्त तापमानामुळे पर्यटकांची पाठ
अॅथेन्सचे महापाैर काेस्टास बकाेयानिसने एलेनी मायरिविली यांची मुख्य तापमान अधिकारी पदावर नियुक्त करण्यात आली आहे. बकाेयानिस म्हणाल्या, हवामान बदलास अॅथेन्सच्या लाेकांचे जीवन व अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम हाेत आहे. शहराचे तापमान जास्त झाल्यास पर्यटक येत नाहीत. हे पर्यटक आमच्या अर्थव्यवस्थेचा आधार आहेत. एलेनी म्हणाल्या, आपण दशकांपासून ग्लाेबल वाॅर्मिंगबद्दल चर्चा करत आहाेत. परंतु तापमानाबराेबर चांगले जीवन जगण्याविषयी चर्चा केली नाही.

बातम्या आणखी आहेत...