आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Argentine Vice President Cristina Fernandez Attack Video Updates । Man Detained After Pointing Gun । Latest Updates

VIDEO अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपतींवर रोखली बंदूक:अखेरच्या क्षणी अडकला ट्रिगर, थोडक्यात बचावल्या क्रिस्टिना; हल्लेखोराला अटक

ब्यूनोस आयर्सएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उपराष्ट्रपती क्रिस्टिना फर्नांडिस यांच्यावर बंदूक रोखल्याच्या संशयावरून अर्जेंटिना पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. उपराष्ट्रपतींना मारण्याच्या उद्देशाने आरोपीने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

ट्रिगरमध्ये अडकल्याने वाचले उपराष्ट्रपतींचे प्राण

राष्ट्रपती अल्बर्टो फर्नांडिस म्हणाले - हल्लेखोराने ज्या बंदुकीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यात पाच गोळ्या होत्या. ट्रिगर अडकल्याने त्याला गोळीबार करता आला नाही. त्यामुळे क्रिस्टिनाचा जीव वाचला.

या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. आजूबाजूच्या लोकांची चौकशी केली जात आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. आजूबाजूच्या लोकांची चौकशी केली जात आहे.

समर्थकांसोबत बोलत होत्या क्रिस्टिना

ही घटना गुरुवारी रात्री घडली. क्रिस्टिना त्यांच्या घराबाहेर समर्थकांसोबत उपस्थित होत्या. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने पॉइंट ब्लँक रेंजवर बंदूक रोखली. आजूबाजूच्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.

हल्लेखोराची कसून चौकशी सुरू

अर्जेंटिनाच्या सुरक्षा मंत्र्यांनी स्थानिक वृत्तवाहिनी C5N ला सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ते म्हणाले- हल्लेखोराने उपराष्ट्रपतींच्या चेहऱ्याजवळ बंदूक रोखली होती. घटनेदरम्यान मोठा गोंधळ उडाला. संशयित क्रिस्टिना यांच्या समोर येताच त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली. हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. ही बंदूक खरी होती की नाही, याचाही तपास सुरू आहे.

क्रिस्टिना यांच्या घराबाहेर का जमा झाले होते समर्थक?

क्रिस्टिना 2007-2015 पर्यंत राष्ट्रपती होत्या. यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. या प्रकरणाची सुनावणी अजूनही सुरू आहे. क्रिस्टिना यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्याच्या निषेधार्थ त्यांचे समर्थक घराबाहेर रॅली काढत होते.

बातम्या आणखी आहेत...