आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराणी एलिझाबेथच्या मृत्यूचा जल्लोष:अर्जेंटीनाच्या अँकरचा व्हिडिओ व्हायरल, टाळ्या वाजवत म्हणाला - अखेर नरकात गेली

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ II च्या मृत्यूने जगभरात हळहळ व्यक्त होत असताना अर्जेंटिनाच्या टीव्ही अँकरचा विचित्र व्हिडिओ समोर आला. हा अँकर महाराणीच्या मृत्यूचा आनंद साजरा करताना दिसत आहे. अँकरचे नाव सॅंटियागो कुनेओ आहे.

व्हिडिओमध्ये अँकर राणीच्या मृत्यूबद्दल टाळ्या वाजवत आनंद व्यक्त करत आहे. राणीचा अपमान करून, अँकर म्हणतो की योग्य व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि वृद्ध स्त्री शेवटी नरकात गेली आहे.

अँकरभोवतीच्या लोकांकडूनही जल्लोष

अँकरसोबतच स्टुडिओमध्ये त्याच्या आजूबाजूला बसलेले लोकही टाळ्या वाजवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अँकर सॅंटियागो राणीवर टीका करत आहे आणि तिच्यासाठी अपमानास्पद शब्द बोलत आहे. आपण अनेक वर्षांपासून एलिझाबेथ राणीच्या मृत्यूची वाट पाहत होतो, असे अँकरने म्हटले आहे.

अँकर कुनेओने शॅम्पेनची बाटली उघडून राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूचा आनंद साजरा केला.
अँकर कुनेओने शॅम्पेनची बाटली उघडून राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूचा आनंद साजरा केला.

सोशल मीडियावर नाराजी

अर्जेंटीनातील अँकरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अँकरच्या या कृतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर एकाने म्हटले आहे की, अँकरला रॉयल फॅमिलीबद्दल चिड असेल, हे आम्ही समजू शकतो, पण त्याने मृत व्यक्तीचा अपमान करणे योग्य नाही. टीआरपी मिळविण्यासाठी अँकरने हे सर्व केले आहे हे उघड आहे. अँकरींग करणारा माणूस जराही हुशार असता तर त्याने जग सोडून गेलेल्याचा अपमान केला नसता.

राणीच्या निधनामुळे अनेकांना शोक

व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे अँकरवर सर्वत्र टीका होत आहे. एका नेटकऱ्याने अँकरवर टीका करताना म्हटले आहे की, एलिझाबेथ यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले. राणी एक महान शासक होती. राणीला माझी श्रद्धांजली.

'धन्यवाद मॅडम, प्रत्येक गोष्टीसाठी', अशा शब्दांत पॅडिंग्टन बेअर नावाच्या युझरने महाराणीला श्रद्धांजली वाहिली आहे.
'धन्यवाद मॅडम, प्रत्येक गोष्टीसाठी', अशा शब्दांत पॅडिंग्टन बेअर नावाच्या युझरने महाराणीला श्रद्धांजली वाहिली आहे.

स्कॉटलंडमध्ये राणीचे निधन झाले

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी उशिरा निधन झाले. 96 वर्षीय राणी स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसलमध्ये राहत होती. येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एलिझाबेथ सर्वाधिक काळ (70 वर्षे) ब्रिटनच्या राणी होत्या. आता प्रिन्स विल्यम वयाच्या 40 व्या वर्षी ब्रिटीश सिंहासनाचे वारसदार बनले आहेत. त्याचे वडील प्रिन्स चार्ल्स (73 वर्षे) आता राजा आहेत.

बातम्या आणखी आहेत...