आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Armed Forces Alerted At 3 Key Locations Near The Border Due To Tensions With China

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर ग्राउंड रिपोर्ट:चीनसोबतच्या तणावामुळे सरहद्दीजवळील 3 महत्त्वाच्या ठिकाणी सशस्त्र दलास अलर्ट

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तराखंड भागात लष्करी हालचाली वाढल्याचे दिसून येते.

लडाख : तणावामुळे पाच भागांतील संचार सेवा बंद
भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावात गलवान क्षेत्राची सर्वाधिक चर्चा आहे. येथेच दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. गलवान क्षेत्र लडाखच्या चुसूल कौन्सिलअंतर्गत येते. लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल (एलएएचडीसी) मध्ये शिक्षण विभागातील कौन्सिलर स्टॅनजिन कॉन्चौक यांनी सांगितले की, गलवान क्षेत्रातील लोकांच्या सद्य:स्थितीबाबत त्यांना माहिती मिळालेली नाही. कारण संपर्क सेवा बंद करण्यात आली आहे. एक ते दोन दिवसांत तेथील स्थिती कळेल, असेही त्यांनी सांगितले. चीन आणि भारताच्या सैन्यामधील चकमकीमुळे लडाखमधील तांग्से, श्योक, फोब्रांग, मानमेरख आणि चुसूलसारख्या भागांमध्ये संचार सेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधण्यात अडथळा येत आहे.

गुप्तचर विभागा (आयटीबीएफ) मध्ये काम केलेल्या ८१ वर्षीय कुंगजंग नांग्याल यांनी सांगितले, अशा घटना १९५९ पासून सुरू आहेत. २१ ऑक्टोबर १९५९ लाही चिनी आणि भारतीय सैन्य आपापसात भिडले होते. त्या वेळी १० पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. हा दिवस पोलिस कोमेमोरेशन डे म्हटला जातो. नांग्याल यांच्यानुसार, दोन्ही देशांच्या सीमेची हद्द जोपर्यंत ठरत नाही, तोपर्यंत अशा प्रकारची तणावपूर्ण स्थिती कायम राहील. तथापि गलवान परिसर अत्यंत धोकादायक आहे. येथे शेतीही होऊ शकत नाही. मात्र तरीही दोन्ही देशांनी या जागेला प्रतिष्ठेचा विषय बनवले आहे. राष्ट्रीय सुरक्षा तज्ञ आणि माजी राजदूत पी.स्टॉपडन यांनी सांगितले, चीनकडून हे सीमा कराराचे प्रत्यक्ष उल्लंघन आहे. आंतराष्ट्रीय समूहांच्या या प्रकरणावरील प्रतिक्रियेविषयी ते म्हणाले की, रशिया याबाबत तटस्थ राहील, मात्र अमेरिका भारताची बाजू घेऊ शकतो. तसेच शेवटी चर्चेमधूनच हा प्रश्न सोडवावा लागेल. कारण यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उत्तराखंड : नेलांग, हर्षिल, खोऱ्यात लढाऊ विमाने

लडाखमध्ये भारत-चीन सीमेवरील लष्करी संघर्षानंतर चीन सीमेजवळील उत्तराखंड भागात लष्करी हालचाली वाढल्या आहेत. तूर्त या आघाडीवर आयटीबीपीची निगराणी आहे. परंतु लष्कर तसेच हवाई दलास हाय अलर्ट देण्यात आला आहे. चिन्यालीसौड हवाई तळावर एन-३२ मालवाहू विमानांची ये-जा वाढली आहे.

उत्तराखंडच्या उत्तरकाशी, चमोली व पिथोरगड जिल्ह्यांच्या सीमा चीनजवळ आहेत. चीनच्या सैनिकांनी अनेक वेळा चमोली सीमेवर एलएसीतून घुसखोरी केली. त्यामुळेच सतर्कता वाढवण्यात आली आहे. चीनजवळील गढवाल सीमा लक्षात घेऊन चिन्यासीसौड हवाई तळ महत्त्वाचा ठरतो. सीमेपासून १०० किमी अंतरावर गेल्या काही वर्षांत भारताने आपला सामरिक पाया बळकट केला आहे. स्थानिक भौगोलिक तज्ञ सुरेश रमोला म्हणाले, चीनसोबतच्या तणावापासूनच येेथे लष्कर व हवाई दलाने अनेक वेळा युद्धसराव केला. परंतु आताची सक्रियता जास्त महत्त्वाची ठरते. चमोली जिल्ह्यातील बडाहोती व माणाजवळील चीनच्या अतिशय संवेेदनशील सीमेवरही अतिदक्षतेचा इशारा आहे.

सध्या येथे शांतता आहे. परंतु जवानांची सक्रियता पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे. अल्मोडाचे ज्येष्ठ पत्रकार प्रेम पुनेठा म्हणाले, उत्तराखंडला लागून असलेली सीमा भविष्यात मोठे संकट निर्माण करू नये हे लक्षात घेऊन लष्कराला सतर्कतेचा इशारा आहे. उत्तरकाशीपासून १२० किमी अंतरावरील नेलांग व ८२ किमीवरील हर्षिलच्या शांत खोऱ्यात लढाऊ विमानांची वर्दळ वाढली आहे. आयटीबीपी अतिशय सतर्क आहे. त्याशिवाय केवळ ३५ किमी अंतरावर असलेले लष्करही परिस्थितीला निपटण्यासाठी तयार दिसून येते. हिमालयाच्या कुशीतील हिमनदीच्या भागात सुखोई विमानांची उड्डाणे सुरू आहेत, असे स्थानिक लोकांनी सांगितले. हवाई दलाने मात्र हा दैैनंदिन भाग असल्याचे सांगितले. चीन सीमेजवळील १२२ किमीचा भाग उत्तरकाशी जिल्ह्यात येतो.

यूपी : सीमेवरील पिलर गायब करून केला कब्जा

भारत व नेपाळ यांच्यातील सीमावादात सोमवारी आणखी भर पडली. उत्तर प्रदेशच्या सीमेवरील लखीमपूर खिरी सीमेवर नेपाळने सीमा दर्शवणारे पिलर रात्रीतून गायब केले आहे. त्याशिवाय नेपाळच्या नागरिकांनी नो मॅन्स लँडच्या मोठ्या भागावर कब्जा केला आहे. सशस्त्र सीमा दलाच्या ३९ व्या बटालियनचे कमांडंट यांनी याबाबतची माहिती जिल्हाधिकारी व गृह मंत्रालयाला कळवली आहे. सीमेवर नेपाळचे कॅलाली व कांचनपूर दोन जिल्हेे आहेत. त्यांची सीमा लखीमपूरला जोडलेली आहे. त्याबद्दलची माहिती २ जूनला एसएसबी कमांडंट मुन्नासिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात आहे. त्यानुसार नो मॅन्स लँड भागात अशा पिलरची संख्या ७४२ आहे. नेपाळी नागरिकांनी मोठ्या संख्येने या भागात ताबा अनधिकृत ताबा घेतला आहे. या घटनेनंतर सीमेवर एसएसबी, आयबी, पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शैलेंद्रसिंह म्हणाले, याबद्दलची माहिती सरकारला देण्यात आली आहे. लॉकडाऊनपूर्वी संयुक्त पाहणी सुरू होती. सीमेतील सुमारे २० ते २५ टक्के पिलर गायब आहेत. दोन्ही देशांतील उच्चाधिकारी चर्चेतून हा पेच सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊनमुळे पाहणीचे काम स्थगित झाले होते. काही भागात नेपाळी नागरिकांनी कब्जा केल्याची माहिती मिळाली आहे. काही भागात भारतीय नागरिकही पुढे गेले आहेत. एक सामान्य प्रक्रियेद्वारे दोन्ही देश हा वाद साेडवतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ३९ वी बटालियन लखीमपूर खिरीमध्ये ६२.९ किमी सीमा भागात तैनात आहे. गायब झालेल्या पिलरच्या गोपनीय माहितीबद्दल काहीही सांगू शकत नाही, असे एसएसबी कमांडंटने स्पष्ट केले. नेपाळच्या अधिकाऱ्यांनी नो मेन्स लँड लोकांमध्ये वाटप केली आहे. सीमेपलीकडील जमिनींचे परस्पर वाटप करण्यात आले. कदाचित ते प्रशासकीय चुकीतूनही घडू शकते. त्यामुळेच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवणार आहोत. त्याशिवाय नेपाळने पाच नवे बॉर्डर आऊटपोस्ट तयार केले आहेत.

चिनी कर्जाच्या सापळ्यात श्रीलंका, नेपाळ, पाक

२०१७ डोकलाम : २०१७ मध्ये चीन व भारत यांच्यात डोकलामवरून पेच निर्माण झाला होता. चीनच्या रस्ते प्रकल्पास भारताने आक्षेप घेतला होता. तो पेच ७३ दिवस होता.

श्रीलंका : चीनने श्रीलंकेत हंबनटोटा बंदर, विमानतळ, कोळसा ऊर्जा प्रकल्प व महामार्ग प्रकल्पांत ३६ हजार ४८० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. २०१६ मध्ये हे कर्ज ४५ हजार ६०० कोटी रुपयांवर पोहोचले. श्रीलंकेला ही कर्जफेड करता आलेली नाही. त्यामुळेच श्रीलंकेला हंबनटोटा बंदर चीनच्या मर्चंट पोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीला ९९ वर्षांच्या लीजवर द्यावे लागले. त्याशिवाय येथे १५ हजार एकर जमीन औद्योगिक प्रकल्पासाठी चीनला द्यावी लागली.

पाकिस्तान : पाकिस्तानने चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सीपीईसी) प्रकल्पांत ४.५६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. परंतु त्यापैकी मोठी रक्कम कर्जाच्या रूपाने दिली आहे. त्याचा व्याजदर ७ टक्के आहे.

नेपाळ : पोखरा भागात चीन बीआरआयअंतर्गत विमानतळाची निर्मित करत आहे. चीनने नेपाळच्या रसुवामध्ये त्रिशूल येथे जलविद्युत प्रकल्पाचीही सुरुवात केली. तिबेटच्या चिलाँग भागापासून ३२ किमी अंतरावर आहे. प्रकल्पात चीनने ९५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

तीन वर्षांत चीन व भारत सीमावाद अनेकदा समोर

२०२० पँगोंग त्सो सराेवर : यंदा ५ मे रोजी सायंकाळी भारत-चीनचे सुमारे २०० सैनिक आमने-सामने आले होते. भारताने चीनच्या सैनिकांच्या तैनातीवर तीव्र आक्षेप घेतला होता. दुसऱ्या दिवशी पहाटेच उभय देशांच्या सैनिकांत धुमश्चक्री उडाली. नंतर प्रकरण शांत झाले. सरोवराचे ४५ किमी क्षेत्र भारतात तर ९० किमी चीनमध्ये येते.

नाकू ला सेक्टर : ९मे रोजी उत्तर सिक्किममध्ये १६ हजार फूट उंचीवरील नाकू ला सेक्टरमध्ये भारत-चीनचे १५० सैनिक आमने-सामने आले होते. त्याबद्दलची अधिकृत तारीख स्पष्ट नाही. तेव्हा धुमश्चक्रीत १० सैनिक जखमी झाले होते. त्याच दिवशी चीनने लडाखमध्ये एलएसीवर हेलिकॉप्टर पाठवले होते. भारतानेही लेह हवाई तळावर सुखोईचा फौजफाटा तैनात ठेवला होता.

बातम्या आणखी आहेत...