आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Army Captured 6 New Peaks Near LAC In 3 Weeks, 3 Times Aerial Fire Was Also Done By Chinese Soldiers To Put A Blockage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनवर उंचीवरुन नजर ठेवू शकणार सैनिक:सैन्याने एलएसीजवळ सहा नवीन शिखरांवर मिळवला ताबा, चिनी सैनिकांनी अडथळा आणण्यासाठी 3 वेळा केला गोळीबार

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सैन्याने मगर हिल, गुरुंग हिल, रेचेल ला, रेजांग ला, मोखपारी आणि फिंगर 4 जवळील शिखरावर ताबा मिळवला
  • शिखरावर भारताने ताबा मिळवल्यानंतर चीनने 3 हजार अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे

लडाख सीमेवर चीनची प्रत्येक हालचाल आता भारताला कळू शकेल. गेल्या 3 आठवड्यांत भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील (एलएसी) 6 नवीन शिखरांवर ताबा मिळवला आहे. 29 ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात सैन्याने ताब्यात घेतलेल्या शिखरांमध्ये मगर हिल, गुरुंग हिल, राचेन ला, रेजांग ला, मोखापारी आणि फिंगर 4 जवळील शिखरांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

सूत्रांच्या माहितीनुसार या शिखरावर कोणीही (रिकामे पडून होते) नव्हते. त्यावर भारतीय लष्कराची नजर होती. चीनी सैन्याने ताब्यात घेण्यापूर्वी भारतीय जवानांनी ते ताब्यात घेतले. त्यामुळे लडाखच्या या भागात भारतीय सैन्याला बढती मिळाली आहे. चिनी सैन्यसुद्धा येथे ताबा मिळवण्याच्या तयारीत होते. आपल्या सैनिकांना धमकावण्यासाठी चीनी सैनिकांनी पांगोंग त्सो तलावाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावरून 3 वेळा हवाई फायरही केले होते.

ज्या शिखरांवर ताबा, ते आपल्या सीमेत
सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, ब्लॅक टॉप हिल आणि हेलमेट टॉप हिल एलएसीवर चीनच्या भागात येते, तर भारतीय सैन्याने ज्या शिखरांवर ताबा मिळवला आहे ते आपल्या बाजूला आहे. शिखरावर सैन्याने ताबा मिळवल्यानंतर चीनी सैन्याने रेजांग आणि रेचेल ला जवळ 3 हजार अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे.

तिकडे, गेल्या काही आठवड्यांपासून चीनच्या भागात येणारा मॉल्डो गॅरिसनमध्ये चीनची पीपुल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या हालचाली वाढल्या आहेत. जेव्हा सीमेवर चीनच्या हालचाली वाढतात, तेव्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजीत डोभाल, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) बिपिन रावत आणि सैन्य प्रमुख मनोज मुकुंद नरवणे परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

चीनने जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अग्रेशन दाखवले
15 जून रोजी, चीनी सैन्याने गालवान खोऱ्यात काटेरी तारांनी भारतीय सैन्यावर हल्ला केला. यात 20 भारतीय सैनिक शहीद झाले. हिंसक संघर्षात किती चिनी सैनिक मारले गेले याची पुष्टी त्यांनी केली नाही.

29-30 ऑगस्टच्या रात्री चीनी सैन्याने पँगॉन्ग लेकच्या दक्षिणेकडील पहाडीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. तेव्हापासून दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर उभे राहिले आहेत. चीननेही 1 सप्टेंबर रोजी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. 7 सप्टेंबर रोजी चिनी सैन्याने दक्षिणेकडील भागात भारतीय चौक्याकडे कूच करण्याचा प्रयत्न केला आणि चेतावणी म्हणून गोळीबार केला होता.

बातम्या आणखी आहेत...