आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध सुधारण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. सीमा विवादानंतर पहिल्यांदा भारतीय सैन्याचे प्रमुख जनरल एमएम नरवणे नेपाळमध्ये जातील. त्यांचा हा दौरा पुढील महिन्यात होईल. आतापर्यंत याची तारीख ठरलेली नाही. नेपाळ आर्मीने बुधवारी याविषयी म्हटले की, त्यांच्या दौऱ्याला नेपाळ सरकारकडून 3 फेब्रुवारीला मंजूरी मिळाली होती. मात्र दोन्ही देशात लॉकडाउन असल्यामुळे ते टळले होते.
नेपाळ आर्मीचे प्रवक्ते ब्रिगेडियर संतोष पौडेल यांनी म्हटले की, 'दोन्ही पक्ष दौऱ्याची तारीख ठरवण्यासाठी संपर्कात आहेत. यादरम्यान नेपाळच्या राष्ट्रपपती विद्या देवी भंडारी जनरल नरवणे यांना नेपाळ आर्मीचे ऑनरेरी जनरलचा रँक सोपवतील. ही 1950 पासून सुरू असलेली 70 वर्षे जुनी परंपरा आहे. यानुसार दोन्ही देश एकमेकांच्या सैन्य प्रमुखांना ऑनरेरी रँक सोपतात.'
जनरल नरवणे यांच्या वक्तव्याने नाराज होते नेपाळ
नेपाळ आणि भारतामध्ये यावर्षी मे महिन्यापासूनच तणाव आहे. दरम्यान जनरल नरवणे यांचा नेपाळ दौरा खूप महत्त्वाचा मानला जात आहे. जनरल नरवणे मे महिन्यात म्हणाले होते की, नेपाळ सीमावर्ती वादाचा मुद्दा दुसर्या देशाच्या भडकावण्यावरुन उपस्थित करत आहे. लिपुलेखपासून मानसरोवरच्या मध्यभागी बनवण्यात आलेल्या भारतीय रस्त्यावर प्रश्न उपस्थित करत आहे. त्यांनी चीनचे नाव घेतले नव्हते, मात्र नेपाळने त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी जाहीर केली होती. नेपाळचे संरक्षण मंत्री ईश्वर पोखरेल यांनी जनरल नरवणे यांच्या या वक्तव्याला अपमानजनक असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते की, भारत नेपाळचा इतिहास, सामाजिक वेशेषता आणि स्वातंत्र्याकडे दुर्लक्ष करत आहे.
नाती सुधारण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले आहेत
अलिकडच्या काही महिन्यांत, दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. ऑगस्टमध्ये नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता. ओली यांनी 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मोदी आणि भारतीय जनतेचे अभिनंदन केले होते. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये परस्पर सहकार्याच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली होती. यानंतर 17 ऑगस्ट रोजी काठमांडूमध्ये दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली होती. यामध्ये नेपाळचे परराष्ट्र सचिव शंकर दास बैरागी आणि भारतीय अधिकाऱ्यांच्या पथकाने भाग घेतला होता. बैठकीत दोन्ही देशांच्या संयुक्त प्रकल्पांना पुढे नेण्याबाबत चर्चा झाली.
दोन्ही देशांमध्ये वाद कसा सुरू झाला
2 नोव्हेंबर 2019 रोजी भारताने आपला नवीन राजकीय नकाशा प्रसिद्ध केला. नेपाळने यावर आक्षेप घेतला होता आणि कलापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख भाग हा आपला प्रदेश म्हणून संबोधले होते. यावर्षी 18 मे रोजी नेपाळने या तिन्ही क्षेत्रांचा समावेश करुन नवीन नकाशा प्रसिद्ध केला. हा नकाशा संसदेच्या दोन्ही सभागृहात पारिक केला. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला. मे-जूनमध्ये नेपाळने भारताच्या सीमेवर सैन्यांची संख्या वाढवली. नेपाळच्या सैनिकांनी बिहारमधील भारत-नेपाळ सीमेवर काही भारतीयांवर गोळीबारही केला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.