आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Army Ready To Face Corona In Shanghai, Test Of 26 Million People, Corona Is Growing In China |Marathi News

कोरोना वाढतोय:शांघायमध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज, 2.6 कोटी लोकांची चाचणी, चीनमध्ये संसर्गात झपाट्याने वाढ

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये कोरोना वाढत चालला आहे. प्रमुख व्यावसायिक केंद्र शांघायमध्ये स्थिती बिघडली आहे. शहरातील सर्व लोकांची कोरोना चाचणी करण्यासाठी सोमवारी मोठे अभियान सुरू करण्यात आले. हे अभियान पूर्ण करण्यासाठी चीनी सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच लष्कराच्या जवानांना तैनात केले आहे. तिन्ही दलांच्या २००० आरोग्य कर्मचाऱ्यांना तिथे पाठवण्यात आले आहे. त्यांच्या मदतीने शहरातील २.६० कोटी लोकांची कोरोना चाचणी केली जातेय. अनेकांना सूर्योदयापूर्वीच उठून घराजवळ तपासणी करण्यास सांगितले. तर अनेक केंद्रांवर लोक सकाळीच रांगेत उभे दिसत आहेत.

भारत : पहिल्यांदा १००० पेक्षा कमी रुग्णसंख्या
भारतात दाेन वर्षांनंतर पहिल्यांदा १००० पेक्षा कमी रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयानुसार २४ तासांत केवळ ९१३ नवे रुग्ण आढळले. ७१५ दिवसांनंतर सर्वात कमी आहेत. २४ तासांत १३ मृत्यू झाले. आता १२,५९७ सक्रिय रुग्ण आहेत. तेही सर्वात कमी आहेत.

बातम्या आणखी आहेत...