आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक सैन्याचे 1.5 लाख कोटींहून जास्त उत्पन्न:लष्कराचे रिअल इस्टेटपासून बँकेपर्यंतचे उद्योग, हेच भ्रष्टाचाराचे मूळ

इस्लामाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
लष्कराचा विमानतळ सेवेचाही व्यवसाय आहे. - Divya Marathi
लष्कराचा विमानतळ सेवेचाही व्यवसाय आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी सहा वर्षांचा कार्यकाळात स्वत:ची कमाई सहापटीने वाढवली. ही माहिती त्यांच्या निवृत्तीच्या आठ दिवस आधी संपत्तीविषयक दस्तऐवज जाहीर झाल्यामुळे उजेडात आली आहे. पाकमध्ये लष्करी अधिकाऱ्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ कशी काय होते, याबद्दल तज्ञांनी दोन कारणे सांगितली आहेत. पहिले कारण-भ्रष्टाचार तर दुसरे लष्कराचा उद्योग-व्यापार. लष्कराचे राजकारणासोबतच उद्योगातही वर्चस्व आहे. पाक संसदेतील महत्वाच्या दस्तऐवजानुसार पाकिस्तानचे लष्कर विविध उद्योगांत १.५ लाख कोटी रुपयांची उलाढाल करते. आर्मी वेल्फेअर ट्रस्ट, मिलिटरी फाउंडेशन, शाहीन फाउंडेशन, बहरिया फाउंडेशन या चार आस्थापनांच्या नावाखाली ते आपले उद्योग चालवते. हे सगळे उद्योग संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत चालतात. या उद्योगांमध्ये बँक, सिमेंट, खते-बियाणे, तेल, गॅस, वीज, मेडिकल, विमानतळसेवा, वीज, साखर, गृहनिर्माणपर्यंतचा समावेश आहे. लष्कर ५० हून जास्त कंपन्या चालवते.

७२ अधिकाऱ्यांची हकालपट्टी : पाकिस्तानी लष्कर देशातील सर्वात मोठे उद्योग घराणे आहे. म्हणूनच पाकचा राजकीय क्षेत्रात जास्त हस्तक्षेप आहे. देश अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत मेजर श्रेणीहून वरिष्ठ ७२ लष्करी अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे.इम्रान खान यांच्या कार्यकाळात सहा लष्करी अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. इम्रान आपल्या जाहीर सभांतून लष्करावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते. निवृत्तीनंतरही लाभ : संरक्षण मंत्रालयाने सर्व सैन्य शाखांसाठी ट्रस्ट स्थापन केले आहेत. मिलिटरी फाउंडेशन, आर्मी वेल्फेअर ट्रस्ट, शाहीन फाउंडेशन सेवानिवृत्त सशस्त्र दलातील सैनिकांच्या कल्याणासाठी आहे. बहरिया फाउंडेशन नौदलातील निवृत्तांसाठी आहे.

स्विस बँकेत २५ निवृत्त अधिकाऱ्यांची खाती, ८० हजार कोटींवर रक्कम जमा क्रेडिट सुइसच्या ऑक्टोबर २०२१ च्या अहवालानुसार पाक सैन्याच्या २५ निवृत्त अधिकाऱ्यांची स्विस बँकेत खाती आहेत. त्यात सुमारे ८० हजार कोटी रुपयांहून जास्त रक्कम जमा आहे. आयएसआयचे माजी प्रमुख अख्तर अब्दुल रहेमान खान यांच्या खात्याचाही समावेश आहे. खात्यावर १५ हजार कोटी रुपये आहेत.

1 लष्करप्रमुख बाजवांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळातच संपत्तीत ६ पटीने वाढ. ती ४५७ कोटींवर गेली आहे. यात अमेरिकेतील मालमत्ताही . 2 पनामा पेपर्सनुसार ले. जनरल शफात शाह यांची लंडन ५ हजार कोटींची संपत्ती आहे. मुशर्रफ यांच्या काळात ते सेकंड इन कमांड अधिकारी. 3 आर्मी क्वेटा कॉर्प्सचे ले. जनरल असीम सलीम बाजवा यांनी पिझ्झा चेन पापा जॉन्समध्ये कुटुंबाच्या नावे २२ हजार कोटींची गुंतवणूक केली. 4 आयएसआयचे माजी प्रमुख मेजर जनरल नुसरत नईम यांच्या परदेशात २७०० कोटी रुपयांच्या कंपन्या असल्याची माहिती उजेडात आली . 5 माजी लष्करप्रमुख अश्फाक परवेझ कयानी यांचे दोन भाऊ १५ हजार कोटी रुपयांच्या इस्लामाबाद गृहनिर्माण घाेटाळ्यात सामील होते.

6 आयएसआयचे माजी प्रमुख असद दुर्राणी यांनी अफूच्या व्यापारात आयएसआयला समाविष्ट केले होते, असा दावा केला जातो.

बातम्या आणखी आहेत...