आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विशेष:जगभरातील टीव्ही कार्यक्रमांमध्ये 30 % एवढी मुस्लिम पात्रे हिंसक कृती करणारी

वॉशिंग्टन20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात मुस्लिम लोकसंख्या सुमारे २५ टक्के आहे. असे असूनही मनोरंजन उद्योग त्यातही टीव्ही मालिका, चर्चेसारख्या कार्यक्रमातील मुस्लिमांचा सहभाग केवळ १ टक्का आहे. पीयू रिसर्च सेंटर व कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अध्ययनातून ही बाब समोर आली आहे. २०१८ व २०१९ दरम्यान अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये प्रसारित होणाऱ्या २०० टॉप टीव्ही कार्यक्रमांचे विश्लेषण करण्यात आले.

या अध्ययनाचे नेतृत्व करणारे स्टेसी स्मिथ म्हणाले, मुस्लिमांना दिलेल्या भूमिका बहुतांश वेळा जास्त हिंसक तसेच परदेशी अशा स्वरूपाच्या दिसतात. त्यांना दहशतवादी तसेच इतर नकारात्मक पात्र म्हणून चित्रित केले जाते. ३० टक्के मुस्लिम पात्रांना इतर पात्रांच्या विरोधात हिंसक काम करताना दाखवले जाते. ४० टक्के जणांना हिंसाचाराचे लक्ष्य करण्यासाठी दाखवले जाते. मुस्लिम महिला किंवा मुलींना कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील अडचणींना तोंड देत असल्याचे दाखवले जाते. त्यात भावनात्मक दबाव व जोखमीचाही समावेश असतो. मुस्लिम महिलांना कोणत्याही मालिकेत मुख्य भूमिका दिलेली नाही. अमेरिकेत मुस्लिमांकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाते.

विशेष : ८७ टक्के कार्यक्रमांत मुस्लिम पात्राचा अभाव अध्ययनानुसार ८७ टक्के शोमध्ये एकही मुस्लिम पात्र दाखवलेले नव्हते. टीव्ही मालिकांमधील ८ हजार ८८५ पात्रांपैकी काही मुस्लिम होते. एकूण मुस्लिम पात्रांपैकी केवळ १३ टक्के जणांना बहुसंख्याक नसलेल्या देशाचे मूळ निवासी दाखवण्यात आले आहे. २ टक्के जणांना स्थलांतरितांचे पात्र दिले गेले. त्यामुळे त्यांची प्रतिमा नकारात्मक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...