आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यास:20 मिनिटांची आर्ट अ‌ॅक्टिव्हिटी 8 तासांच्या झोपेसमान, यामुळे व्यक्तीचे आयुर्मान 10 वर्षांपर्यंत वाढू शकते

वृत्तसंस्था | लंडन22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कलेमुळे दीर्घायुष्यासाठी मिळते मदत, युनिव्हर्सिटी ऑफ लंडनचा अहवाल
  • मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी आर्ट अ‌ॅक्टिव्हिटीची मदत मिळते

कला प्रकारात वेळ घालवणेही मेंदूसाठी फायदेशीर ठरू शकते. कला मानवी जीवनाचा आधार आहे आणि तिचा आयुष्यात समावेश करणे खूप आवश्यक आहे. कलेतून तणाव कमी होतो, मूड चांगला होतो आणि भावनिक संतुलन राखण्यात मदत मिळते. वाढत्या वयासोबत कलेत वेळ घालवल्यास लोक दीर्घायुषी होऊ शकतात.

युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये झालेल्या एका संशोधनात समोर आले की, सुमारे २० मिनिटांच्या आर्ट अॅक्टिव्हिटीमुळे आयुर्मान वाढण्यास मदत मिळते. संशोधनानुसार, महिन्यात एक आर्ट अॅक्टिव्हिटीचा समावेश करून आयुष्य १० वर्षांपर्यंत वाढवले जाऊ शकते. जॉन हॉपकिन्स स्कूल ऑफ मेडिसिनचे पेडर्सन ब्रेन सायन्स इन्स्टिट्यूटचे संशोधक आयव्ही रॉस यांच्या म्हणण्यानुसार, दररोज २० मिनिटांची आर्ट अॅक्टिव्हिटी ८ तासांच्या झोपेसमान फायदेशीर असते. तुम्ही दिवसभर आर्ट अॅक्टिव्हिटी करण्यात सक्षम नसाल तर तुम्ही ती दिनचर्येत सहज सहभागी करू शकता. नृत्य, शिलाई काम, स्वयंपाक करणे किंवा आर्ट गॅलरीत जाण्यासारख्या सोप्या पद्धती आहेत.

बऱ्याचदा कला आणि शिल्प मुलांचा खेळ असल्याचे लोक मानतात. मात्र, प्रत्येक वयाचे लाेक कलेतून फायदा प्राप्त करू शकतात. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, कलेचा अादर करणेही मेंदूसाठी लाभदायक असते.