आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार संशोधनांच्या आधारे निष्कर्ष:पापणी लवताच खऱ्याप्रमाणे खाेटी स्मृती तयार करतो मेंदू, यामध्ये 3 सेकंदांत 30 टक्क्यांपर्यंत होते वाढ

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूत अनेक चांगल्या गोड आठवणी असतात. असे असतानाही आपला मेंदू खऱ्या आठवणींपेक्षा अधिक वेगाने बनावट आठवणी तयार करतो. इतकेच नव्हे तर ते दर ३ सेकंदाला सुमारे ३० पर्यंत वाढ होते. अॅमस्टरडॅम विद्यापीठात नुकत्याच झालेल्या एका संशोधनाच्या आधारे ही बाब समोर आली.

या अभ्यासासाठी चार वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. पहिल्या प्रयोगात लोकांना लाल कारचे चित्र दाखवण्यात आले. तेव्हा त्यांना सांगण्यात आले की त्यांनी लाल रंगाची कार असलेला रस्ता पाहिला होता. ज्यांनी हे खोटे सत्य मानले, त्यांनी नंतर या साखळीशी संबंधित काही इतर प्रतिमा पाहिल्या ज्यात ती लाल कार नव्हती. असे असले तरी ही सर्व छायाचित्रे त्यांना यापूर्वी दाखविण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. यानंतर त्यांना प्रश्न विचारले असता त्यांना योग्य उत्तरे देण्यात फारशी अडचण आली नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका प्रयोगात संशोधकांनी अक्षरे सरळ आणि उलट क्रमाने दाखवली. काही सहभागींना अक्षरे पाहण्यापूर्वी ब्लॉकरचा सामना करावा लागला. मूळ स्मृती बदलता यावी यासाठी ते विस्कळीत अक्षरांपासून बनवले.

सहभागींना पहिल्या स्लाइडवरून लक्ष्य अक्षर आठवण्यास सांगितले. पहिली स्लाइड पाहिल्यानंतर अर्ध्या सेकंदानंतर, २०% लोकांनी उद्दिष्ट अक्षराची काल्पनिक स्मृती तयार केली होती. मानवी मेंदूतील आठवणी तो जे पाहतो त्यानुसार बदलतात.

अंतर्गत पूर्वग्रहांतूनही आकार घेतात खोट्या आठवणी लोकांना एक चेहरा व व्यवसायाचे चित्र दिले जाते तेव्हा काळ्या रंगाची मोठी दाढी आणि मिशा असणाऱ्या चेहऱ्यांना “ड्रग डीलर’ सारख्या गुन्हेगारी शिक्क्याशी जोडण्याची अधिक शक्यता असते. पूर्वग्रह स्मृतींवर परिणाम करतात हे दिसते.