आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत कमी होतोय ट्रम्प यांचा दबदबा:अमेरिकेत ट्रम्प युग समाप्तीकडे, रॉन डिसेन्टिस यांना प्रथम पसंती

न्यूयॉर्क / मोहंमद अली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आता आपल्याच रिपब्लिकन पक्षामध्ये उपेक्षित होत चालले आहेत. रिपब्लिकन पक्षात ट्रम्प युग संपण्याच्या मार्गावर आहे. नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची निराशाजनक कामगिरी, जुमलेबाजी, न्यायालयीन खटल्यांमुळे ट्रम्प यांच्या लोकप्रियतेचा आलेख आपल्याच पक्षात घसरत आहे. ट्रम्प यांनी २०२४ च्या अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीसाठी गेल्याच महिन्यात आपल्या दावेदारीची घोषणा केल्यानंतर असे घडत आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुखाबाबत झालेल्या सर्वेक्षणात चकित करणारे निकाल समोर आले. सफॉक विद्यापीठ व यूएसए टुडेच्या सर्वेक्षणात रिपब्लिकन पक्षाच्या ६५ टक्के मतदारांनी ट्रम्प यांच्या तुलनेत फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसेन्टिस यांना प्रथम पसंती दिली. सीएनएनच्या सर्व्हेमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या ६२ टक्के मतदारांनी २०२४ च्या राष्ट्रपती निवडणुकीत ट्रम्पऐवजी इतर चेहऱ्याला उमेदवार करण्याचे समर्थन केले. आपल्याच पक्षातील लोकप्रियता घटण्याचा हा काळ ट्रम्प यांना प्रथमच पाहावा लागत आहे. रॉन डिसेन्टिस आपल्या कंझर्व्हेटिव्ह धोरणांमुळे रिपब्लिकन मतदारांत सातत्याने आपली पकड मजबूत करत आहेत. यामुळे ५ वर्षे पक्षात एकछत्री राज्य करणारे ट्रम्प आता मागे पडत आहेत.

धोरणांना समर्थन, ट्रम्प यांना नाही : रिपब्लिकन पक्षाच्या बहुतांश मतदारांनी ट्रम्प यांच्या धोरणांचे समर्थन केले आहे. मात्र, २०२४ मध्ये ते राष्ट्रपती उमेदवार म्हणून ट्रम्प यांचे समर्थन करू इच्छित नाहीत. सफॉक विद्यापीठाचे डेव्हिड पॅलियोलोगस म्हणाले, कॅपिटल हिंसेमुळे ट्रम्प यांना नुकसान झाले.

भारतवंशीय जज ट्रम्प यांना वरचढ : युएस डिस्ट्रिक्ट कोर्टाचे जज अमित मेहता यांनी कॅपिटल हिंसाप्रकरणी ट्रम्प यांना आपल्या समर्थकांना प्रक्षोभक भाषण देण्याचे दोषी ठरवले होते. आपल्या ११२ पानांच्या निर्णयात मेहता म्हणाले, ट्रम्प यांनी जाणीवपूर्वक आपल्या समर्थकांना हिंसेसाठी भडकवले होते.

जो बायडेन यांची ट्रम्पवर आघाडी : मध्यावधीत डेमोक्रॅटिक पक्षाला सीनेटमध्ये बहुमत मिळाले. तेव्हापासून राष्ट्रपती बायडेन यांची लोकप्रियता वाढली. एका सर्वेक्षणानुसार, २०२४ च्या राष्ट्रपती निवडणुकीत ट्रम्प व बायडेन यांच्यात सामना होण्याची स्थिती निर्माण झाली तर राष्ट्रपती बायडेन यांना ५९%, तर प्रतिस्पर्धी ट्रम्प यांना ४१% मते मिळण्याची शक्यता आहे.

डिसेन्टिस यांची व्होट बँक दुप्पट
फ्लोरिडाचे गव्हर्नर डिसेन्टिस यांची व्होट बँक मध्यावधीनंतर पक्षात दुप्पट झाली. रिपब्लिकन मतदारांचे म्हणणे आहे, पक्षाचा उमेदवार तरुण व ऊर्जावान असला पाहिजे. ट्रम्प यांच्या एका वरिष्ठ सहकाऱ्याने दैनिक भास्करला सांगितले, ट्रम्प यांना धोरण बदलावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...