आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Mahatma Gandhi's Great Grandaughter । Ashish Lata Ramgobin । Sentenced To 7 Years In Jail । Fraud Case In South Africa; News And Live Updates

गांधीजींच्या पणतीला आफ्रिकेत तुरुंगवास:3 कोटींची व्यावसायिक फसवणूक केल्याप्रकरणी 7 वर्ष तुरूंग, आशिष लता 2015 पासून जामिनावर

जोहान्सबर्गएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लिनेनचे 3 कंटेनर ऑर्डर करण्यासाठी मागितले होते पैसे

महात्मा गांधी यांची पणती आशिष लता रामगोबिनला (56) दक्षिण आफिक्रेत 7 वर्षांचा तुरंगवास झाला आहे. डर्बन येथील एका न्यायालयाने सोमवारी व्यावसायिक प्रकरणात 3.22 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात त्या 2015 पासून जामीनावर होत्या.

लता रामगोबिन या महात्मा गांधीजींच्या पणती असून प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या इला गांधी आणि मेवा रामगोबिन यांच्या कन्या आहेत. मेवा रामगोबिंद यांचे निधन झाले आहे. तसेच इला गांधी यांना भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशांत राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील मोठे उद्योजक एस.आर. महाराजांनी त्यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. महाराज यांच्याकडे न्यू आफ्रिका अलायन्स फूटवेअर वितरक नावाची कंपनी आहे. कंपनी पादत्राणे, कपडे आणि तागाचे आयात, विक्री आणि बनवण्याचा व्यवहार करते. त्यांची कंपनी इतर कंपन्यांना आर्थिक मदत देखील करते.

लिनेनचे 3 कंटेनर ऑर्डर करण्यासाठी मागितले होते पैसे
आशिष लता रामगोबिनने 2015 मध्ये एस. आर. महाराजांची भेट घेतली. दरम्यान, त्यांनी भारतातून 3 लिनेनचे कंटेनर आणणार असल्याचे आश्वासन दिले. व त्याला दक्षिण आफ्रिकेपर्यंत कंटेनर आणण्यासाठी पैशाची गरज असल्याचे सांगितले. हे कंटेनर दक्षिण आफ्रिकेच्या हॉस्पिटल ग्रुप नेट केअरला दिले जाणार असून नेट केअर कंपनीशी संबंधित कागदपत्रेही त्यांनी एसआर महाराजांना दाखवली. नेट केअर कंपनीची कागदपत्रे आणि लता रामगोबिन यांचे कुटुंबीय पाहून महाराजांनी त्यांच्याशी व्यवहार करताना पैसे दिले. दोघांमध्ये नफा वाटून घेण्याचीही चर्चा होती.

महात्मा गांधी यांची नात आणि आशिष लता यांची आई इला गांधी
महात्मा गांधी यांची नात आणि आशिष लता यांची आई इला गांधी

2.68 लाख रुपये जमानतीसाठी जमा केले होते
संबंधित प्रकरणात फसवणूकीचा खुलासा झाल्यानंतर कंपनीच्या संचालकांनी लताविरोधात कोर्टात खटला दाखल केला होता. लताविरूद्ध न्यायालयात 2015 मध्ये खटला सुरू झाला. सुनावणीदरम्यान, लता यांनी गुंतवणूकदाराला पटवून देण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि चालान दाखवले राष्ट्रीय फिर्यादी प्राधिकरणाचे (एनपीए) ब्रिगेडिअर हंगवानी मुलौदजी म्हणाले. तागाचे कोणतेही कंटेनर दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले नसल्याचेदेखील ते म्हणाले. त्यामुळे 2015 मध्ये लताला 2.68 लाख रुपयाच्या जामिनावर सोडण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...