आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आशियातील देशांमध्ये निर्बंध हटवण्यावर जोर, लसीकरणासह संसर्ग रोखण्याचे प्रयत्न सुरू

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाकाळाच्या सुरुवातीच्या काळात आशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांनी झीराे काेविडची रणनीती स्वीकारली हाेती. त्यानुसार सीमाबंदी करण्यात आली हाेती. कडक लाॅकडाऊन केले हाेते. हाॅटेल क्वाॅरंटाइन केले. त्याचे सकारात्मक परिणाम देखील दिसून आले. काेराेनाच्या रुग्णसंख्येत घट झाली. परंतु आता झीराे काेविडची रणनीती प्रभावी ठरत नाही. म्हणूनच या देशांनी आता लसीकरणाचे प्रमाण खूप वाढवले. एवढे करून देखील काेराेनाचा फैलाव राेखण्यात थाेपवू शकले नाहीत. त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला. त्यामुळे आशिया-प्रशांतमधील अनेक देशांनी झीराे काेविडची रणनीती साेडू लागले आहेत. काेराेनासाेबत जीवन जगण्याचे सूत्रही त्यांनी स्वीकारले आहे. सिंगापूरने ८३ टक्के लाेकसंख्येचे लसीकरण केल्यानंतरही संसर्गाचे प्रमाण कमी करण्यात यश मिळवले नाही. अखेर आता सिंगापूरने नऊ देशांतील नागरिकांसाठी आपल्या सीमा खुल्या केल्या आहेत. सिंगापूरचे पंतप्रधान ली हॅसिन लाँग यांनी काेराेनासाेबत जगावे लागेल, असे जाहीर केले.सिंगापूरच्या नॅशनल हाॅस्पिटलचे डाॅ. पाॅल तमबया म्हणाले, आम्ही आपल्याच यशामुळे पीडित झालाे आहाेत. काेराेनाशी लढण्यासाठी लसीकरण हाच एकमेव फाॅर्म्युला आहे, असे मानणे चुकीचे हाेते.

काेराेनासाेबत लाेकांनी जगले पाहिजे
आॅस्ट्रेलिया : पंतप्रधान स्काॅट माॅरिसन म्हणाले, संसर्ग वाढला तरी रुग्णालयांना तयारी ठेवावी लागणार आहे. न्यूझीलंड : सर्वाधिक कडक लाॅकडाऊन लागू केला गेला. पंतप्रधान जेसिंडा अर्डन म्हणाल्या, झीराे काेविडच्या पलीकडे विचार करावा लागेल.

व्हिएतनाम : सुरुवातीला झीराे काेविड धाेरण हाेते. परंतु त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम हाेत आहे. म्हणून हे धाेरण साेडावे लागेल. हाँगकाँग : माेठ्या प्रमाणात लसीकरण करूनही संसर्गाचा फैलाव राेखता आला नसल्याने सरकारने आता मेडिकल सुविधा देण्यावर भर दिला आहे.

राेज रुग्णसंख्येत वाढ
सिंगापूरमध्ये राेज तीन हजारांहून जास्त रुग्ण आढळून येत आहेत. आॅस्ट्रेलियातही दरराेज सुमारे दाेन हजार, न्यूझीलंडमध्ये पाचशे रुग्ण आढळून येत आहेत. या तीनही देशांनी झीराे काेविडला आपले लक्ष्य ठेवले हाेते. परंतु संसर्गाला राेखण्यात यश न आल्याने सर्वांनी झीराे काेविड धाेरणाला यूटर्न केले आहे.

बातम्या आणखी आहेत...