आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Asthma Sufferer Recovers From Shock Of Father's Death; Climb The Seven Highest Volcanic Mountains In The World

जिद्द:वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्यानंतर अस्थमा पीडित सावरली; जगातील सर्वात उंच सात ज्वालामुखी पर्वतांची चढाई

लंडन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वय ४३ वर्षे. पेशा पत्रकारिता. दम्यासारख्या आजाराने पीडित असूनही सात खंडात वसलेल्या सात ज्वालामुखींच्या पर्वतराेहणाची कामगिरी फत्ते करून दाखवली. ही राेमांचक कहाणी आहे साेफी कॅर्न्स यांची. त्या आधी साेफी यांनी कधी गिर्याराेहण केलेले नव्हते. मग त्यांना ज्वालामुखीच्या पर्वतांची चढाई करायचे का बरे सुचले असावे? त्यावर साेफी म्हणाल्या, मला चेरिल काेल यांच्याकडून प्रेरणा मिळाली. आफ्रिकेतील सर्वात उंच ज्वालामुखी पर्वताची यशस्वी चढाई केली हाेती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पुढे अंटार्क्टिकातील सिडली (४,२८५ मीटर), मेक्सिकाेचे पिकाे डी आेरिजाबा (५,६३६ मीटर), पापुआ न्यू गिनीमधील गिलुवे (४,३६७ मीटर), चिलीतील डेल सालाडाे (६,८९३ मीटर), टांझानियातील किलिमंजाराे (५,८९५ मीटर), इराणचे दमवंद (५,६०९ मीटर), रशियातील माउंट एल्ब्रस (५,६४२ मीटर) यांची यशस्वीरित्या चढाई केली. या सर्व ज्वालामुखी पर्वतांची चढाई विक्रमी सहा महिन्यात पूर्ण केली. मी तीस वर्षांची हाेते. तेव्हा माझ्या वडिलांचा मृत्यू झाला हाेता. तेव्हा ते केवळ ६४ वर्षांचे हाेते. कर्कराेग त्यांच्या मृत्यूचे कारण हाेते. त्यांच्या मृत्यूचा मला धक्का बसला हाेता. मला त्यामधून बाहेर पडायचे हाेते. एके दिवशी मासिक वाचत हाेते. त्यात चेरिल काेलच्या काॅमिक रिलिफसाठी निधी संकलनासाठी माउंट किलिमंजाराे चढाईची बातमी वाचण्यात आली. त्यांचे पर्वतावरील छायाचित्र पाहिल्यावर मी देखील त्यांच्यासारखी चढाई करण्याचा संकल्प केला.

ऑक्सिजनची कमतरता, श्वासाेच्छ्वासास त्रास
साेफी म्हणाल्या, माझा संकल्प व याेजनेबद्दल कुटुंब आणि मित्रांना माहिती दिली. त्यांनी ही याेजना माझ्यासाठी याेग्य नसल्याचा सल्ला दिला हाेता. दम्याचा त्रास असल्याने आईला चिंता वाटत हाेती. उंचावर ऑक्सिजनची कमतरता असूनही साेफी यांनी कामगिरी फत्ते केली.

बातम्या आणखी आहेत...