आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • At Present 50,000 People Are Being Spied On, But If Not Stopped, 5 Crore Poaching, Spyware Trade Needs To Be Stopped: Snowden; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:सध्या 50 हजार लोकांची हेरगिरी, पण रोखले नाही तर 5 कोटी शिकार, स्पायवेअर व्यापाराला रोखणे गरजेचे : स्नोडेन

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीआयएचे माजी संगणकतज्ज्ञ एडवर्ड स्नोडेन यांचा अंदाज, भविष्यात हेरगिरीत वाढ

इस्रायली कंपनी एनएसआेचे स्पायवेअर ‘पेगासस’द्वारे पत्रकार, नेते, न्यायाधीश, वकील, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची हेरगिरी करण्याची चर्चा आहे. त्यावर अमेरिकेतील केंद्रिय गुप्तचर संस्था सीआयएचे माजी संगणकतज्ञ एडवर्ड स्नाेडेनने आपले मत व्यक्त केले आहे. स्नाेडेन यांनी २०१३ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या लाेकांच्या निगराणी कार्यक्रमाचा भंडाफाेड केला हाेता. ‘द गार्डियन’ला स्नाेडेन यांनी मुलाखत दिली. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सध्या ५० हजार लाेकांची हेरगिरी केली जात आहे अशा भ्रमात राहता कामा नये. कारण भविष्यात पाच काेटी लाेकांचीदेखील हेरगिरी हाेऊ शकते. अशा गाेष्टी व त्यांच्या विस्ताराला तत्काळ राेखले पाहिजे.

स्नाेडेन म्हणाले, भविष्यात हेरगिरीचा वेग आपल्या अंदाजापेक्षा खूप असेल. सरकारच्या प्रायाेजित हॅकरद्वारे काेणताही माेबाइल फाेन सुरक्षित नाही. सरकारने आंतरराष्ट्रीय स्पायवेअरच्या व्यापारावर जागतिक स्तरावर बंदी घातली पाहिजे. अण्वस्त्रांची बाजारपेठेत निर्मिती करण्याची परवानगी नाही. त्याप्रमाणेच स्पायवेअरसाठीदेखील परवानगी असता कामा नये. कमर्शियल मालवेअरने काेणत्याही सरकारसाठी हेरगिरी शक्य करून दाखवली आहे. ‘पेगासस प्राेजेक्ट’च्या अभ्यासातून ही बाब उजेडात आली आहे.

या प्रकल्पानुसार जास्तीत जास्त लाेकांवर आक्रमकपणे निगराणी ठेवण्यात आली आहे. त्यात पाेलिसांना पारंपरिक पद्धतीने एखाद्याचा फाेन रेकाॅर्ड करण्याची गरज पडली नाही. ईडीच्या छाप्यांचीदेखील गरज पडली नाही. कमर्शियल स्पायवेअरद्वारे निगराणीत खर्च व जाेखीम दाेन्ही कमी हाेती. त्यामुळेच दुरूनच हेरगिरी शक्य झाली. म्हणूनच अशा प्रकारच्या हेरगिरी तंत्रज्ञानाच्या विक्रीवर बंदी गरजेची आहे. अन्यथा त्याचा वारंवार वापर हाेईल, असा धाेका कायम राहील. सामान्य गाेष्टींतही त्याचा वापर केला जाऊ शकताे.

समान माेबाइल, साॅफ्टवेअरने हेरगिरीचे काम साेपे
हॅकरपासून स्वत:चा बचाव कसा करता येऊ शकताे, असे विचारल्यावर स्नाेडेन म्हणाले, बहुतांश माेबाइल फाेन सारखेच आहेत. पेगाससद्वारे व्यापक प्रमाणात निगराणी त्यामुळे साेपी झाली. जगभरातील आयफाेनमध्ये समान साॅफ्टवेअर असतात. त्यामुळे हॅकर एक आयफाेन हॅक करण्याची पद्धती शाेधून काढतात. त्यांच्यासाठी दुसऱ्या आयफाेनला हॅक करण्याची पद्धतही साेपी आहे.

बातम्या आणखी आहेत...