आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनंदन..!:नववर्षाच्या प्रारंभी भारतात 59,995 चिमुकल्यांचे आगमन, गतवर्षीपेक्षा 7,390 ने कमी; चीनमध्ये 35615 जन्मले : युनिसेफ

न्यूयॉर्क4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव‌वर्षातील प्रथम चिमुकल्याचा प्रशांत क्षेत्रातील फिजीत जन्म - Divya Marathi
नव‌वर्षातील प्रथम चिमुकल्याचा प्रशांत क्षेत्रातील फिजीत जन्म
  • एक जानेवारी रोजी जगभरात 3.7 लाख बालकांनी घेतला जन्म

वर्ष २०२१ च्या प्रारंभीच १ जानेवारीला भारतात ५९,९९५ बालकांचा जन्म झाल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्र बाल निधीने (युनिसेफ) वर्तवला आहे. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, गत १ जानेवारीच्या तुलनेने ही संख्या ७,३९० (१ जानेवारीला २०१९ ला ६७,३८५ बालके जन्मले होते) ने कमी आहे. आश्चर्यजनक बाब म्हणजे, सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या चीनमध्ये १ जानेवारीला ३५,६१५ बालकांनी (गतवर्षी ४६,२९९ बालकांचा जन्म) जन्म घेतला. हे प्रमाण भारतापेक्षा जवळपास निम्मे आहे.

युनिसेफनुसार, १ जानेवारीला जगातील २३६ देशांत ३,७१,५०४ बालकांचा जन्म झाल्याचा अंदाज आहे. यापूर्वी १ जानेवारी २०२० ला जगात ३,९२,००० बालकांच्या जन्माचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, यासाठी युनिसेफने बालकांच्या जन्मासंबंधी माहिती, नोंदणी आणि राष्ट्रीय स्तरावरील देशांतर्गत सर्वेक्षण डेटाचा उपयोग केला आहे. तर २०२१ मध्ये जगात १४ कोटी बालकांचा जन्म होण्याची शक्यता आहे. यांचे सरासरी आयुर्मान ८४ वर्षे तर भारतातील बालकांचे ८०.९ वर्षे असण्याचा अंदाज आहे. युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी डॉ. यास्मिन अली हक यांच्यानुसार, मुलांच्या सुरक्षित जीवनासाठी महामारीला रोखणे अत्यावश्यक आहे. यासाठी युनिसेफने सरकार, खासगी संस्था व सर्व सहकाऱ्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे प्रत्येक बालकाचा जिवंत राहण्याचा अधिकार अबाधित ठेवता येईल. युनिसेफचे कार्यकारी संचालक हेनरिटा फोर म्हणाले, आधीच्या तुलनेत आता कोरोनाच्या दुष्टचक्रात बालकांचा जन्म झाला आहे. त्यामुळे स‌र्वांनी एकत्रितपणे बालकांसाठी निष्पक्ष, सुरक्षित, व निरोगी जगाच्या दिशेने २०२१ ची सुरुवात करायला हवी.

३,७१,५०४ पैकी निम्म्या बालकांचा भारत-चीनसह दहा देशांत जन्म
युनिसेफनुसार, वर्षाच्या पहिल्या दिवशी जन्मलेल्या ३,७१,५०४ बालकांपैकी निम्म्यांचा जन्म भारत-चीनसह १० देशांत झाला. यात नायजेरियामध्ये २१,४३९, पाकमध्ये १४,१६१, इंडोनेशियात १२,३३६, इथिओपियात १२,००६, अमेरिकेत १०,३१२, बांगलादेशात ९,२३६, इजिप्तमध्ये ९,४५५ व कांगोमध्ये ८,६४० बालकांचा जन्म झाल्याचा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...