आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंमत:वैमानिकाला बेशुद्ध झाल्याचे पाहून प्रवाशाने विमानाचे केले सुरक्षित लँडिंग, कॉकपिटचे प्रिंट पाहून एटीसीने दिल्या सूचना

फ्लोरिडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत विमान चालवण्याचा कसलाही अनुभव नसलेल्या एका प्रवाशाने हिंमत दाखवून जोखमीच्या प्रसंगी विमानाचे सुरक्षित लँडिंग केले. वैमानिक बेशुद्ध झाल्याचे पाहून या प्रवाशाने सेसना २०८ लाइट विमानाला बुधवारी फ्लोरिडा विमानतळावर उतरवले. या विमानाने मार्श हार्बर येथील लिओनार्दो एम. थॉम्सन आंतरराष्ट्रीय विमानतळाहून फ्लोरिडाच्या दिशेने उड्डाण केले होते. प्रवासादरम्यान वैमानिक अचानक बेशुद्ध पडला. संकटात सापडलेल्या प्रवाशाने हवाई नियंत्रण कक्षाकडे मदत मागितली. वैमानिक बेशुद्ध झाल्याचेही त्यांना सांगितले. त्या वेळी विमान फ्लाेरिडापासून ११३ किमी अंतरावर समुद्रावरून जात होते. यादरम्यान नियंत्रण कक्षाने पाम बीच सेसना विमानाच्या कॉकपिटचे प्रिंट घेतले. वाहतूक नियंत्रक रॉबर्ट मॉर्गन यांनी प्रवाशाला योग्य सूचना देऊन िवमानाला नियंत्रित केले होते.

गरोदर पत्नीच्या भेटीसाठी प्रवासी जात होता
लाइव्ह एटीसी डॉट नेटच्या ऑडिओनुसार अज्ञात प्रवासी गरोदर पत्नीच्या भेटीसाठी विमानाने जात होता. फेडरल विमान प्रशासनाच्या म्हणण्यानुसार एक इंजिनाच्या या विमानातून दोन प्रवासी जात होते.

बातम्या आणखी आहेत...