आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये उइघर मुस्लिमांवर अतोनात अत्याचार:UN च्या अहवालात ठपका; चीन मानवतेविरोधात गुन्हा करत असल्याचा आरोप

जिनिव्हाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या शिनजियांग क्षेत्रात उइघर मुस्लिम जातीय व धार्मिक पातळीवर अतोनात अत्याचार सहन करावे लागत आहेत. हा खुलासा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या एका अहवालातून झाला आहे. येथील नागरिकांच्या मानवाधिकार हक्कांचे सर्रास उल्लंघन सुरू असून, त्यांच्यावर बंधक बनवून अत्याचार केले जात आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

शिनजियांगमधील नागरिकांना कोठडीत ठेवले जात आहे. त्यांच्यावर जबरदस्तीने वैद्यकीय उपचार केले जात आहेत. एवढेच नाही तर त्यांचे अवयव काढून काळ्या बाजारात विकले जात आहेत. त्यांचे लैंगिक शोषणही होत आहे, असे युनोने आपल्या अहवालात म्हटले आहे.

चीनच्या शिनजियांग क्षेत्रात 15 लाखांहून अधिक उइघर मुस्लिमांना जातीय व धार्मिक पातळीवर अन्याय-अत्याचाराचा सामना करावा लागत आहे, असे युनोचा अहवाल सांगतो.
चीनच्या शिनजियांग क्षेत्रात 15 लाखांहून अधिक उइघर मुस्लिमांना जातीय व धार्मिक पातळीवर अन्याय-अत्याचाराचा सामना करावा लागत आहे, असे युनोचा अहवाल सांगतो.

अहवाल जारी व्हावा, अशी चीनची इच्छा नव्हती

युनोचा हा अहवाल यापूर्वीच सार्वजनिक होणार होता. पण चीनने त्याचा कडाडून विरोध केला होता. हा रिपोर्ट उजेडात यावा अशी त्याची इच्छा होती. या अहवालामुळे पाश्चिमात्य देशांचा चीनकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. हा रिपोर्ट चीनची प्रतिमा मलीन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे, असे चीनचे म्हणणे होते. पण अखेर चीनचा विरोध डावलून हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

चीनकडून आंतरराष्ट्रीय गुन्हा

चीनवर नेहमीच उइघर, जातीय व धार्मिक अल्पसंख्यकांवर अत्याचार केल्याचा आरोप होतो. या अहवालातही याची पुष्टी झाली आहे. चीनमधील उइघर व अन्य जातीय अल्पसंख्यकांना भेदभावपूर्ण पद्धतीने अटक केली जात आहे. त्यांचे कायदेशीर हक्क हिरावून घेतले जात आहेत. याकडे मुलभूत अधिकारांवर निर्बंध म्हणूनही पाहता येईल. हा एक आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ट्रेनिंग सेंटर व सायकेट्रिक रुग्णालयावर प्रश्नचिन्ह

2015 पासून आतापर्यंत 99 कार्यकर्त्यांना जबरदस्तीने मानसोपचार रुग्णालयात दाखल करुन टॉर्चर करण्यात आले.

रिपोर्टमध्ये चीनच्या व्होकेश्नल एज्युकेशन अँड ट्रेनिंग सेंटर व मनोरुग्णालयात केल्या जाणाऱ्या उपचारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. एका मानवाधिकार समुहाने दावा केला आहे की, चीन राजकीय कैदी व कार्यकर्त्यांना वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करण्याची शिक्षा देत आहे. अहवालात मनोरुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या पीडितांशी मारहाण केली जात आहे. त्यांना इलेक्ट्रिक शॉक दिला जात आहे. अनेकदा तर त्यांना अनेक दिवसांपर्यंत बंदिस्त केले जाते, असे ते म्हणाले.

उइघर मुस्लिमांची जबरी नसबंदी

चिनी सरकारचे अधिकारी डिटेंशन सेंटरमध्ये अल्पसंख्यकांना डांबून ठेवतात. त्यांना जबरदस्तीने औषधी देतात. त्यांच्यावर कुटुंब नियोजन व बर्थ कंट्रोल धोरण भेदभावपूर्णपणे लागू केले जाते.

चीनवर अनेकदा डिटेंशन सेंटरमध्ये उइघरांचे अवयव काढण्यात येत असल्याचे आरोप झालेत.
चीनवर अनेकदा डिटेंशन सेंटरमध्ये उइघरांचे अवयव काढण्यात येत असल्याचे आरोप झालेत.

चीनमधील मानवाधिकारांची स्थिती गंभीर

यूएन मानवाधिकार आयोगाच्या आयुक्त मिशेल बाचेलेट यांचा 4 वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वी 13 मिनिटे अगोदर हा अहवाल जारी करण्यात आला. डिसेंबर 2021 मध्ये मिशेल बाचेलेटने हा अहवाल लवकरात लवकर जारी करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना त्यात यश आले नाही. त्यांना प्रखर टिकेचा सामना करावा लागला. त्या म्हणाल्या -अहवाल सार्वजनिक होण्यास विलंब झाला. पण मला माझ्या कारकिर्दीत हा अहवाल सार्वजनिक होताना पहावयाचा होता. हा एक गंभीर मुद्दा आहे.

बातम्या आणखी आहेत...