आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूलच्या गुरुद्वारावर हल्ला:गोळीबार 13 स्फोट, 2 ठार; भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा बदला घेतला- आयएसकेपी

काबूल11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या कर्ते परवान या गुरुद्वारावर शनिवारी झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यात दोन जण ठार झाले तर सात जण जखमी झाले. मृतांमध्ये अफगाणी शीख सविंदर सिंह आणि इस्लामिक अमिरात फोर्सचा सदस्य आहे.

हँड ग्रेनेड आणि रायफलने सुसज्ज दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे गुरुद्वाराच्या प्रवेशद्वारावर स्फोट घडवला. त्यानंतर आत घुसून अंदाधुंद गोळीबार आणि एकानंतर एक १३ स्फोट घडवले. प्रत्युत्तराच्या गोळीबारात एक हल्लेखोर ठार झाला.मात्र स्फोटकांनी भरलेले वाहन उडवून देण्याचा कट सुरक्षा रक्षकांनी उधळला. सध्या गुरुद्वारात २५ ते ३० हिंदू आणि शिखांनी आश्रय घेतला आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला, असे सांगून हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट खुरासान (आयएसकेपी) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. दुसरीकडे, अफगाणचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहंमदचा हात असल्याचा आरोप केला आहे.

गुरुद्वारावरील पाचवा मोठा हल्ला
अफगाणिस्तानमध्ये शिख धर्मस्थळावरील हा पाचवा मोठा हल्ला आहे. त्यापैकी बहुतांश हल्ल्यांची जबाबदारी आयएसकेपीने घेतली आहे. मार्च २०२० मध्ये हर राई साहिब गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यात २५ लोक मारले गेले होते. २०१८ मध्ये जलालाबादमधील हल्ल्यात १९ शीख ठार झाले होते. कर्ते परवान परिसर हा हिंदू - शीख बहुल आहे. सध्या अफगाणमध्ये फक्त १४० शीख लोक आहेत.

बातम्या आणखी आहेत...