आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीफांवर हल्ला:लंडनमध्ये पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर हल्ला, अज्ञान व्यक्तीने मोबाईल फेकून मारला, अंगरक्षक जखमी, हल्लेखोर इम्रान यांचा समर्थक

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानातील बदलत्या राजकीय घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर लंडनमध्ये हल्ला झाला आहे. यात एका अज्ञात व्यक्तीने नवाज यांना आपला मोबाईल फेकून मारला. सुदैवाने त्यात नवाज यांना कोणतीही इजा झाली नाही. पण, त्यांचा अंगरक्षक जखमी झाला आहे. ही घटना नवाज यांच्या लंडन स्थित कार्यालयाबाहेर घडली. हल्लेखोर पाक पंतप्रधान इम्रान खान यांचा समर्थक असल्याचा दावा केला जात आहे.

नवाज यांच्या कन्या मरियम शरीफ यांनी एका ट्विटद्वारे या घटनेची माहिती दिली. त्यांनी ट्विट केलेल्या फोटोत एका व्यक्तीच्या कपाळातून रक्त येत असल्याचे दिसून येत आहे. इम्रान सरकारविरोधातील अविश्वास ठरावावामुळे अवघ्या पाकचे राजकारण ढवळून निघाले असताना ही घटना घडली आहे हे विशेष. नवाज सध्या उपचारासाठी लंडनमध्ये आहेत.

बातम्या आणखी आहेत...