आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्ये पुन्हा पोलिओ लसीकरण पथकावर हल्ला:खैबर पख्तुनख्वामध्ये गोळीबार, टीमचे रक्षणासाठी तैनात असलेले 4 पोलीस ठार

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात शुक्रवारी अज्ञात हल्लेखोरांनी पोलिओ लसीकरण पथकावर गोळीबार केला. त्यामुळे पोलिओ टीमच्या सुरक्षेवर तैनात असलेले 4 पोलिस शहीद झाले तर 2 जखमी झाले. टँक जिल्ह्यातील गुल इमान भागात ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्लेखोरांनी पोलिस व्हॅनवर हल्ला केला.

पोलिस आणि हल्लेखोरांमध्ये बराच वेळ गोळीबार सुरूच असल्याचे स्थानिकांनी सांगितले. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

28 जून रोजीही हल्ला झाला
पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पोलिओ लसीकरण पथकावर हल्ले वाढले आहेत. 28 जून रोजी, पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तान आदिवासी जिल्ह्यात पोलिओविरोधी लसीकरण पथकावरही हल्ला झाला होता, ज्यामध्ये दोन पोलिसांसह तीन जण ठार झाले होते. 30 जुलै रोजी पेशावर जिल्ह्यातील दौदझई भागात पोलिओ जवानांचे रक्षण करणाऱ्या बंदुकधारी पोलिस हवालदारावर गोळ्या झाडल्या होत्या.

अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या
वायव्य पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात 1 ऑगस्ट रोजी पोलिओ कर्मचार्‍यांच्या पथकाचे रक्षण करणार्‍या पोलिस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यानंतर, 15 ऑगस्ट रोजी खैबर पख्तूनख्वामध्ये पोलिओ टीमच्या सुरक्षेत तैनात असलेल्या दोन पोलिसांना गोळ्या घालण्यात आल्या.

पोलिओ टीमवर हल्ले
पाकिस्तानातील अनेक भागात लोक पोलिओविरोधी लसीकरणाच्या विरोधात आहेत. पोलिओच्या थेंबांमुळे लोकांमध्ये वंध्यत्व येते, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, ही मोहीम तुमच्या सुरक्षेसाठी आहे, असे सरकार जनतेला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

बातम्या आणखी आहेत...