आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Attack On The Station By Order Of Alexander, Who Wreaked Havoc In Syria; More Than 44 Million Ukrainians Flee War torn Country |marathi News

युद्धाचा 45वा दिवस:सिरियात कहर करणाऱ्या रशियन लष्करप्रमुखांच्या आदेशानेच युक्रेनमध्ये स्थानकांवर हल्ला; 44 लाखांहून जास्त नागरिकांनी सोडला देश

कीव्हएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाचे युक्रेनवर ४५ व्या दिवशीही हल्ले सुरूच होते. शुक्रवारी क्रोमटोर्स्क येथील रेल्वेस्थानकावरील क्षेपणास्त्र हल्ल्याचे आदेश क्रूरकर्मा मानले जाणारे रशियाचे अलेक्झांडर डोर्निकोव्ह यांनी दिले होते. ब्रिटनच्या वृत्तपत्राने हा दावा केला आहे. लष्करप्रमुख अलेक्झांडर यांनी सिरियात कहर केला होता. त्यांनी सिरियात भीषण हल्ले केले होते. हल्ल्यातील मृतांमध्ये बहुतांश देशातून पलायन करणाऱ्या महिला-मुलांचा समावेश होता. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या रॉकेटच्या एका बाजूने रशियन भाषेत काही ओळी लिहिलेल्या होत्या. त्यावर रशियन भाषेत ‘हे मुलांसाठी’ असे शब्द होते. त्यावरून क्रूरकर्मा लष्करप्रमुखाचा चेहरा समजतो.

रशियन हल्ल्याचा ४५ वा दिवस, मकारिव्हमध्ये नरसंहार
रशियन सैनिकांनी मकारिव्हमध्ये १३२ नागरिकांना गोळ्या घातल्या. मकारिव्हप्रमुख वादिम तोकर म्हणाले, ४० टक्के शहर बॉम्बहल्ले, गोळीबारात उद्ध्वस्त झाले. कीव्हपासून पश्चिमेस ५० किमीवरील १० हजार लोकसंख्येच्या मकारिव्हची २२ मार्च रोजी युक्रेनच्या लष्कराने रशियाच्या तावडीतून सुटका केली.४४ लाखांहून जास्त युक्रेन नागरिकांनी युद्धग्रस्त देश सोडला.