आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियाने सोमवारी युक्रेनच्या अनेक प्रमुख शहरांत बॉम्बहल्ले करून वीज-पाणीपुरवठ्यात अडथळा आणला. यात दोनत्स्क, ओडेसा, क्रोप्येवत्स्की, खार्कीव्हसह अनेक शहरांचा समावेश आहे. बंकर्सच्या रूपात वापरल्या जाणाऱ्या मेट्रोवरही हल्ला झाला. परिणामी, कीव्हची मेट्रो सुविधा बंद झाली. राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी किरिलो टिमोशेंको म्हणाले, शत्रू पुन्हा क्षेपणास्त्रांद्वारे युक्रेनवर हल्ला करत आहे. सर्वाधिक ओडेसा शहरावर परिणाम झाला. येथे क्षेपणास्त्र हल्ल्याने पम्पिंग स्टेशनमधील वीज गायब झाली. यामुळे संपूर्ण शहरात अनिश्चित काळासाठी पाणीटंचाई झाली आहे. युक्रेनची सरकारी वीज कंपनी युक्रेनर्गाेने अधिकृत वक्तव्यात सांगितले की, क्षेपणास्त्र हल्ल्यांत पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. याचे परिणाम युक्रेनसाठी भयावह होऊ शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.